Tag: Marathi sahitya

  • सुकण्ण – SUKANN

    कंठ शंख आवाज पुणेरी नखऱ्याचा नव बाज पुणेरी झणक फणक मिरचीचा ठसका ऐक समुद्री गाज पुणेरी ढोल नगारे लखलाभ तुला वाजविते पखवाज पुणेरी गालांवर रक्तिमा स्वरांकित नयनांनमधली लाज पुणेरी सुकण्ण सळसळते दो बाहू सुनेत्रास सरताज पुणेरी

  • पत्री – PATREE

    अक्षर मोती शिम्पल्यातले अक्षर पत्री टपटप झरले जीवांमधले भाव रुजाया पत्रावरती जलद बरसले कितीक पत्रे किती छप्परे दारे भिंती फळे जाहले वनी अंगणी कैक काफिये रदीफ इंजिन त्यास जोडले अलामतीला जपेन म्हणता चिद्घन चपलेचे कर जुळले  

  • बकरी – BAKRI

    बकरी म्हण वा तिला भाकरी पसंत खाण्या मला भाकरी बाकुर सारण काहीही भर उचल करंजी कला भाकरी लळा लागल्यावरती बकरी खाऊ म्हणते चला भाकरी देय बाहुली थापुन भाकर भाजतोय बाहुला भाकरी तांदुळ ज्वारी रागीचीही करून देते तुला भाकरी क्षुधा शमविते लोरी गाते दोन तागडी झुला भाकरी उदरभरण अबलांचे करण्या देह तपविते बला भाकरी

  • मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान – YOG DAAN

    मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान… ‘ जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा’ ‘जखमा अशा सुगंधी’ या गझलकार श्री, इलाही जमादार या पहिल्याच गझल संग्रहातल्या एका गझलेतील हा शेर. जखमा अशा सुगंधीनंतर इलाहींचे एकूण चार ग़ज़ल संग्रह अणि मुक्तक व् रुबायांचा एक संग्रह प्रकाशित झाला. मराठी गझल जगतात…

  • गझलेचे स्थान – GAZALECHE STHAN

    गझलेचे स्थान मराठी कवितेच्या किंवा काव्याच्या जगतातील गझलेचे स्थान मराठी गझल ही मराठीच्या काव्यवाटिकेतील एक फुल मानल्यास ती मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे, कारण मराठी काव्य हा मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे. वाङ्मय सागरात अनेक विविध प्रकार अंतर्भूत असतात, जसेकी इतिहास, चरित्रे, प्रबंध, शास्त्रीय शोधांवरील ग्रंथ, विज्ञान ग्रंथ, भौतिक शास्त्रे, अध्यात्म शास्त्रे, कविता (काव्य), कथा,…

  • इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा – SAMIKSHA

    इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा लेखिका सुनेत्रा नकाते प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशक/मुद्रक दीपक चांदणे, अस्मिता चांदणे प्रथमावृत्ती १६ जून २०१३,स्वागत मूल्य १५० रुपये अर्पण पत्रिका माझी आई श्रीमती पद्मावती सुभाषचंद्र अक्कोळे हिच्या चरणी अर्पण मनोगत मी जेव्हा गझल लेखनास प्रारंभ केला तेव्हा श्री इलाही जमादार यांच्या गझला वाचून मी खूप प्रभावित झाले. श्री इलाही जमादार…

  • चिकित्सा – CHIKITSA

    राजा अपुला वजीर व्हावा नको बोलका पोपट रे पंत उपाधी खरी खरी पण उपमा अस्सल खोपट रे राणी अपुली राणी असुदे राजासंगे तृप्त सुखी नको क्वीन चा वजीर हाजिर गा अंगाई थोपट रे शुद्धमतीने गझल लिहावी साच्यामधली मूर्त नको प्राकृत भाषा जिन वाणीची उधळे मिथ्या जो पट रे ऋषी मुनींच्या ऋद्धी सिद्धी देव दिगंबर ग…