-
ग्रीन पीस – GREEN PEACE
शांत कमल दली लेक निगीण लाल लाल जरी नेक निगीण मुक्त गझल तळी अंतर मीर धवल तरल सयी डेक निगीण जन्मदिवस लिली शांत तडाग कृष्ण नील जली केक निगीण गुरु दिगंबर घन श्यामल धीर पूर्व पुण्य जणू चेक निगीण लक्ष अब्ज जगी कलश मिनार ग्रीन पीस मणी एक निगीण क्षीर नीर रवी शीतल मून शेक…
-
नेक – NEK
नेक … शांत कमलदली लेक निगीण लाल लाल जरी नेक निगीण मुक्त गझल तळी अंतर नीर धवल तरल सयी डेक निगीण गुरू पौर्णिमा … सहज सलिल लीलया दावते बिम्ब अंतरीचे स्वरुप जळस्थळी खरे दावते चिम्ब अंतरीचे कलेकलेने निज आत्म्याची कळी उमलता सिद्ध शिलेवर प्रतिक दावते टिम्ब अंतरीचे
-
मेरुस्तंभ – MERU STAMBHA
मेरुस्तंभ मम जिनालयाचा भक्कम पाठीशी कार्य कराया आत्महितास्तव कायम पाठीशी सिद्धासन धनुरासन माझे जिनमूर्ती पुढती नित्य पहाटे आसनमुद्रा उद्यम पाठीशी शब्द अक्षरे नित्य परजुनी धार तयां लावते स्वमन जिंकण्या दशधर्मातिल संयम पाठीशी जीव जगाया जीवनदायी रस पाजे भूमी सृष्टी जपण्या पंचभुतांचा आलम पाठीशी घाम रक्त सांडून निर्जरा सुनेत्रास करण्या पुण्याईच्या संचितातली रक्कम पाठीशी
-
चौखूर – CHOUKHUR
उधळले घोडे रणी चौखूर आता संयमाचा बदलला बघ नूर आता आज मी पण या घडीला संकटांना ठोकल्यावर जाहली ती चूर आता मासळी बाजार नाही भरत देही काजळेना लोचनांना धूर आता लाभल्यावर दूरदृष्टी आत्मश्रद्धा संपला तो काळही निष्ठूर आता सांजवाती तेवताती मम सुनेत्री अंतरी ना माजते काहूर आता
-
घुमट – GHUMAT
हृदय गर्भात रत्नत्रय झळझळाया भरुन कर कलशास करकमली वसे शासन जिनांचे पूर्ण ब्रह्मांडी खिरे वाणी त्रिदल कमली नको रोखूस श्वासाला नको चुकवूस नजरेला भिडव नेत्री भिजाया चिंब प्रतिबिंबी नयांच्या दोन धारांनी नयन कमली निळ्या नक्षत्र वाटांनी बरसता माळ हस्ताची नऊ रात्री झरे संगीत लहरींचे रसा माळेत ज्वालांच्या सलिल कमली ऋतूंचे सोहळे साही टिपाया नयन आतुरले…
-
मुन्ना मुन्नी – MUNNA MUNNI
आठवतो मज माझा कुरळ्या जावळातला मुन्ना मर्फी आठवते मज माझी गुबरी लेक बाहुली मुन्नी बर्फी मोठा झाला शिकला घडला संस्कारानी जिनधर्माच्या सत्य अहिंसा जपण्यासाठी लढला मुलगा मुन्ना मर्फी मोठी झाली कन्या शिकली गुपित जाणुनी स्वधर्म जपूनी कुटुंब अपुले सुखी व्हावया लढली मुलगी मुन्नी बर्फी कुटुंब अमुचे समृद्धीने धनधान्याने भरून वाहण्या वाहन घर धन जमीन जुमला…
-
खेळ – KHEL
आत्मा माझा गुरू खरा निश्चय नय हा धरू खरा व्यवहाराची साथ मिळे खेळ जाहला सुरू खरा पुद्गल असती शब्द जरी मंत्र अक्षरी भरू खरा लंबक दोले हळूहळू भाव अंतरी झरू खरा मूर्त सुनेत्रा घडवाया चिरा चिऱ्याने चिरू खरा