Tag: Marathi sahitya

  • शिदोरी – SHIDOREE(PACKED MEAL)

    राऊळाची वाट सुंदर नि सोपी कैवल्य चांदणे खिरे घनातून घाटातून वाट चढत जाऊया डोंगरी निर्झर खळाळे बागडे पुण्याची शिदोरी सोडून वाटून खाऊ घास घास आनंदाने ओंजळीने पाणी पिऊन तहान भागेल खरेच चला पुढे जाऊ राऊळ दिसले हात जोडले मी कळस झळाळे सूर्य किरणात चंद्रकोर बीज गगनात आली अंतरी शुद्धात्मा जिनदेव माझा राऊळी गाभारा घंटेचा निनाद…

  • व्यंजन – VYANJAN(LETTER)

    व्यंजन “च” ना भरीचे हे पण खरेच रे परिपूर्ण अर्थवाही नच ठेच टेचरे सावज शिकार पारध शब्दांस जोडुनी मी ताणले धनुष्या बाणात खेच रे नाहीस तू जनावर माणूस जाणता खुडतोस का कळ्यांना पुष्पांस वेच रे बोटातल्या कलेचे लालित्य ओळखू ठोकून काय होते पिळण्यास पेच रे अर्था अनर्थ म्हणती कोंडून भावना चैतन्यदा “सुनेत्रा” पाडा चरे चरे

  • कृष्ण मेघ – KRUSHN MEGH(BLACK CLOUD)

    चाललीस जाण्या पुढती ठाम निश्चयी तू गाळले न अश्रू गाली ठाम निश्चयी तू जाणलीस तत्त्वे साती ठाम निश्चयी तू जाहला न वारा वैरी ठाम निश्चयी तू भटकलास खेडोपाडी जाहलास योद्धा अडकला न मोही जाली ठाम निश्चयी तू गोड बोल बडबड गाणी रचत हसत गाशी लावतेस सुंदर चाली ठाम निश्चयी तू काजळून जाण्यासाठी जन्म तुझा नाही…

  • पर्दाफाश – PARDAFASH(UNMASKING)

    तांब्याभांडे घासूनीया धारेखाली ते खंगाळ लिंबूमीठाने तैसेची स्नानासाठी हे घंगाळ शेवंती पुफ्फे गुंफूनी अंबाड्याला फांती माळ दो दो पिंडांना सोसेना खारे गोडे अश्रू ढाळ मेतेताई लोकांच्या त्या राज्याची धानी इंफाळ पुष्पांच्या आधी लावाया नावे रंगांची गंधाळ सांभाळा हो बाबाबाई जीवा जीवांचा संसार कामांधांनी नाही व्हावे भोगूनी बाल्या वंगाळ लंब्याचौड्या गप्पाबाता भक्ती लोभी लोकांच्यात गोष्टी छोट्या…

  • बर्थ – BIRTH

    बघ समर्थ रेस रे देय अर्थ रे स रे काफियात इंग्रजी आज वर्थ रेस रे कृष्ण धवल लीड मम करुन शर्थ रे स रे घन रदीफ आत्मजा ना अनर्थ रे सरे ती अरेस का करे घेय बर्थ रे स रे

  • उड्डाण – UDAAN(FLIGHT)

    अंतर्यामी स्वप्न पाखरू रत्नत्रय गुण रत्न पाखरू बिंब पाहण्या हृदय जली मम स्वतःत रमते मग्न पाखरू पंख पसरुनी उड्डाणास्तव करे लाखदा यत्न पाखरू आगम आदि पुराण उत्तर वाचुन उकले प्रश्न पाखरू थेम्ब न गाळे दो नयनातुन जन्म मरण वा लग्न पाखरू काम क्रोध त्यागून उडाले कृतज्ञ पण न कृतघ्न पाखरू अभंग आत्मा मूर्त सुनेत्रा भाव…

  • डाळ – DAAL(PULSE)

    घर भरले उखडून लाटणे टाळावे उघड्यावर संसार थाटणे टाळावे …मतला (जमीन ) उडणाऱ्याचे पंख छाटणे टाळावे परीवरी काल्पनिक भाळणे टाळावे .. हुस्न ए मतला देणाऱ्याचे भाव न कळती प्रत्येका कैक पुस्तके फुकट वाटणे टाळावे गरज किती तव इच्छा म्हणुनी वाढविशी परधन वनिता भोग बाटणे टाळावे पुरणाचा कट जमून येण्या सारावर घाई करुनी डाळ हाटणे टाळावे…