-
घर किती प्रिय ! – GHAR KITEE PRIY !
घर किती प्रिय ! घर किती प्रिय असतं आपल्याला … त्यात आपली एक एकत्र family ..कुटुंब रहात असतं .. गुण्यागोविंदाने ! एका सुंदर प्रभातीस मला असेच काही सुंदर लिहायचा mood उफाळून आला… म्हणून बसले आमच्या familyकट्ट्यावर आणि लागले लिहायला.. या कट्ट्यावरची पोरं पोरी मला आवडतात. त्यांच्यात असताना माझी प्रतिभा शक्ती साकी बनून मला काहीतरी देत…
-
इलाज – ILAAJ
वाळलेली शुष्क पाने लटकलेली कोवळी प्रासुक उन्हाने बहरलेली झिंगलेली गझल साकी बघ सुनेत्रा आम्रतरुवर गात गाणे झोपलेली … मयुरपिसारा हरिणी पाडस धवल लाल पुष्पांची पखरण हिरवाईने सलज्ज काया मात्रा माझ्या इलाज औषध … जर्द लाल जर्बेरा आणिक धवल पीत कुसुमांची वर्दळ हिरवाईचे वसन लपेटुन ऐके पानांची मी सळसळ अक्षर ओळी पाठवलेल्या पत्रामधुनी आठवतिल ग सई…
-
आरक्त – AARAKT
लोक हे दिसले न पूर्ण विरक्त मजला वाटले काही तरी पण सक्त मजला प्राशुनी माधुर्य गझले पश्चिमेसम सांजसमयी व्हायचे आरक्त मजला जोगवा मागे न पाळे मी तिथीही का तरी म्हणतात कोणी भक्त मजला आवडे मज मम मुठीतुन विश्व बघणे मौन म्हणते राहुदे अव्यक्त मजला ही बरी की ती सुनेत्रा काय सांगू जी खरी ती भावते…
-
शून्य शून्य – SHOONYA SHOONYA
आत्म्यात बिंब अपुले मी नित्य पाहतेरे आत्म्यात शुद्ध भावे मी सत्य पाहतेरे जिनबिम्ब दर्शनाने मी धन्य धन्य झाले किमया तुझी बघुनी मी शून्य शून्य झाले ….. भरता भरता बुडते घागर भरून वरती येते तरंगते पाण्यावर हलके तरून वरती येते निवांत जीवनगाणे आता गाण्यासाठी जगते एक एक क्षण जगून जगून घ्यावा जगण्यासाठी तरते … एक रुबाई…
-
लगा गालगा – LA GAA GAAL LA GAA
कुणी चेचले सांग तुला कुणी पाडले सांग तुला नकोसे तुझे हे जीवन रे कुणी टोचले सांग तुला लगागा लगा गा गालल गा कुणी फिरवले सांग तुला असे वागणे सोड बरे कुणी ठोकले सांग तुला मुळे पकडुनी घट्ट रहा कुणी पकडले सांग तुला लगा गालगा गाल लगा कुणी वाचले सांग तुला सुनेत्रातले अर्थ खरे कुणी दावले…
-
टायर – TAAYAR(TYRE)
कधी कधी मी असते टायर कधी फुटूनी उडते टायर एक रिटायर टायर दिसता कधी नवे मी बनते टायर एक रिटायर एक स्टेपणी कधी असे पण म्हणते टायर काय लागते शेर लिहाया कधी गझल मग लिवते टायर मक्ता लिहिणे बरे सुनेत्रा कधी गुरूला स्मरते टायर
-
छडी – CHHADEE
अंध गुढीची छडी अंध पिढीची छडी दे दे फेकूनिया अंध रुढीची छडी