कोण धुतल्या तांदळासम न्याय करण्या ये पुढे
बघ मुनी जैनी दिगंबर पाय धरण्या ये पुढे
गायराने ओरबाडून खावया मलिदा पुरा
वासरासह सोडली तू गाय चरण्या ये पुढे
आगमे पिंछी कमंडल साधने अन साधना
नयन झरले वचन झरले काय झरण्या ये पुढे
सांडलेल्या भावनांना ठेव पात्री तपवुनी
आसवांवर साठलेली साय धरण्या ये पुढे
जोड अंतर भाव जोडुन अंतराशी बोलण्या
मी सुनेत्रा हात देते हाय करण्या ये पुढे