Tag: Marathi sahitya

  • चारोळी बाई – CHAROLI BAI

    चारोळी बाई झर ओळी बाई अंगणी काढते रांगोळी बाई पुरणास वाटून कर पोळी बाई विकाया बिब्ब्यास फिर बोळी बाई उरकून टाक तू अंघोळी बाई घामाने भिजली धू चोळी बाई शिमग्यास सुनेत्रा कर होळी बाई

  • जहाल साकी – JAHAAL SAAKEE

    चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता कुणी न बघते कसे फुलांच्या जपायचेरे मनास आता अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ तू सुवास आता जुनाट कर्मावरी उतारा मलाच देते जहाल साकी तयांस प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले करुन…

  • पूर्ण जीवन POORN JEEVAN

    व्यवहारे जो जगे नये निश्चयाने त्याला मुक्ती वरे निश्चयाने सतमार्गाने जगावया पूर्ण जीवन आत्महिता मी जपे निश्चयाने

  • हसूत पसरट अथवा तिरके – HASOOT PASARAT ATHVAA TIRAKE

    हसूत पसरट अथवा तिरके आम्ही स्वतःशी वा कोठेही घेऊ काळजी स्वतः स्वतःची .. वा जगताची कशास चिंता मग जगताची सार मिळो वा सांबाराचे मारू भुरके हसूत पसरट अथवा तिरके उपदेशाचे किती फवारे तुमचे तुम्हा लखलाभ होऊदे सतत हसावे अन हसवावे कुणी न उरले आता परके हसूत पसरट अथवा तिरके एकांतीही हसून घ्यावे पोट भरावे ..…

  • विळीसमान – VILEESAMAAN

    मोर नाचतो नाच नाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती … वक्रपणा मम विळीसमान वेलांटीच्या कळीसमान सुमान माझा शब्द भरीचा कुसुमांकित दळ खळीसमान … फक्त वासना फुलवित जाते जिथे फुलोरा हवा कशाला असा दिखाऊ प्रथे फुलोरा मूर्त असावी घरी अंतरी वा गाभारी अहंपणाचा नको त्यावरी…

  • जिन राहतो – JIN RAAHATO

    जिन राहतो माझ्यासवे माझ्या घरी मम अंतरी सांगू कशाला हक्क पुद्गल सांडल्या शब्दांवरी मी पाहिल्या अन ऐकल्या गोष्टी किती भूतातल्या पण वर्तमाना जागते जगण्या कथा लिहुनी खरी मधुचंद्रमा पूर्णाकृती माथ्यावरी घन सोबती दुग्धातल्या बिंबासही भिजवावया आल्या सरी फुलुनी कळ्या गंधाळता जाईजुईचा ताटवा कोजागिरीच्या अंगणी शांती इथे नांदे खरी मौनातली झाडे पुन्हा करतात जेव्हा लावणी येते…

  • सुंदरता – SUNDARTAA

    मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती