Tag: Marathi sahitya

  • शब्दविन्यास – SHABD VINYAAS

    शुद्ध आत्म्यातून उमटे मंत्रशक्तीची कला साधना स्वर व्यंजनांची ईशभक्तीची कला शब्दविन्यासात दर्शन मातृकादेवी तुझे जीवनातिल सत्य आर्जव जीवमुक्तीची कला संयमाने मार्दवाचा धर्म रुजण्या अंतरी मम क्षमेने शिकविली मज क्रोधभुक्तीची कला काफिया नि रदीफ यांचे वेगळेपण जाणण्या वर्णमालेतिल तिरंगी गझल युक्तीची कला अंतरी जे प्रीत जपती लीलया तिज पेलती झोकुनी देती स्वतःला ती न सक्तीची कला

  • आनन – AANAN

    अभ्यासाचे साधन पुस्तक ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक स्वाध्यायास्तव विनम्र भावे करते हाती धारण पुस्तक दो घटकेच्या मौजेखातर नकोस ठेवू तारण पुस्तक जीव ओतुनी लिहिल्यावरती आत्मसुगंधी कानन पुस्तक बिंब दाविते ज्याचे त्याला तुझे सुनेत्रा आनन पुस्तक

  • सांज आरती – SAANJ AARATEE

    सांज आरती संधीकालची बेला पावन चोविस जिन स्मरले.. दिवा लावुनी हृदयापाशी कर मी जोडियले… कैलासावर ऋषभ जिनेश्वर अजित संभव सम्मेदावर … मोक्षाला गेले दिवा लावुनी हृदयापाशी कर मी जोडियले… अभिनंदन सुमती सम्मेदी पद्म सुपार्श्व जिन सम्मेदी … मोक्षाला गेले दिवा लावुनी हृदयापाशी कर मी जोडियले… चंद्र पुष्पदंत सम्मेदी शीतल श्रेयांस सम्मेदी… मोक्षाला गेले दिवा लावुनी…

  • सिद्धता – SIDHHATAA

    मी न कुठली पाठ करते सिद्धता सोडवीते पायरीने सिद्धता पायऱ्यांना गाळले तेव्हांच रे जाणल्यावर पूर्ण आहे सिद्धता सिद्ध जेव्हा मी स्वतःला करितसे यत्न सारे करुन मांडे सिद्धता ओळखूनी क्षेत्र हितकर मम जिवा झरत जाते सहज येथे सिद्धता मी सुनेत्रा नित्य माझी साधना पक्ष साध्यातून साधे सिद्धता

  • गरे वाटण्या – GARE VAATANYAA

    विसरुन जा ते असे कुणाला म्हटले तरिही आयुष्याशी बोलू द्यावे .. बरे वाटण्या फणस खोबरी वर काटेरी सोलायाला मदत विळ्याला करण्यासाठी .. गरे वाटण्या बरे वाटता गरे वाटता झरे वाहती हृदयामधले ऊर मोकळा .. होतो नकळत अंतरातुनी उमलुन येतो अभिनय उपजत खऱ्यांपुढे पण खरे वागणे .. खरे वाटण्या

  • कुरल -KURAL

    गझलेसाठी गझल हवी .. सृष्टीसम ती कुशल हवी … वरवर वाटे कुरल जरी .. अंतरातुनी सरल हवी… जरी दाटते गच्च मणी .. झरताना पण तरल हवी … नको कोरडी ठक्क बरे .. जलदासम ती सजल हवी … गझल सराईत गझल नवी .. नित्य वाटण्या नवल हवी …

  • अनस – ANAS

    अनस अक्षरात अन सह्यांत .. हृदय स्पष्ट स्वच्छ ह्यांत … गाळ गाल वा लगाल .. दीर्घ र्हस्व काय ह्यांत … ही लगावली लिहून .. ठेव पुस्तके वह्यांत … ह्यांत हा रदीफ जाण .. काफिया अनसच ह्यांत … अनस केव स्वच्छ काय .. काफिया स्वर बघ ह्यांत … पात्र माझिया मनात .. डोकवे कली न ह्यांत…