निर्भेळ भेळ माझी आहे गझल गुणांची
दिलदार खेळ माझी आहे गझल गुणांची
ताशा गिटार बाजा वेणू गुणी तुतारी
संगीत मेळ माझी आहे गझल गुणांची
रानात शांत समयी ओटी भरून आई
उजवेल केळ माझी आहे गझल गुणांची
रत्नेच जी अपत्ये त्यांना सुखे रहाया
साधेल वेळ माझी आहे गझल गुणांची
परिणाम भाव शुद्धी हेतूत आत्मगोष्टी
म्हणतेय हेळ माझी आहे गझल गुणांची
शब्दार्थ
हेळ – सांग