Tag: Marathi sahitya

  • राही – RAAHEE

    सोडून सर्व देते धरले कधी न काही गझलेस रंग देण्या मी माझियात पाही वाटा अनेक होत्या काहीच मी निवडल्या जगणे मजेत होते झाले कधी न त्राही माझेच गीत मजला पण वाटते न माझे देण्यास मोद सर्वां म्हटले कधी न नाही गोष्टीत शील कोणा मन कल्पनाच वाटे गोष्टीवरून कोणी शोधेल मूळ राही गझलेस पूर्ण करण्या साकी…

  • डाकिया – DAAKIYAA

    फुका कधी ना वाढविते मी भाव माझिया भावाचा अर्थपूर्ण मम गझल उमलते होत काफिया भावाचा लयीत येती शब्द नाचरे रदीफ होण्या गझलेचा परिमल पसरव गझल फुलांतिल तूच वारिया भावाचा कर्माष्टक जाळून तपाने हिशेब चुकता करुन पुरा देवगुणांच्या टोळीमधला मुक्त डाकिया भावाचा आंतरजाली फिरता रमता कर्मास्रव झाल्यावरती अंतरातही जाळे विणतो सुबक कोळिया भावाचा देहमंदिरी आत्मा माझा…

  • रट्टा – RATTAA

    लेखणीने, मार रट्टा, कागदांवर, कैक कोऱ्या, जागुनी तू.. घाल बेड्या, रंगलेले, हात धरुनी, पकड चोऱ्या, जागुनी तू… फक्त इनपुट, द्यायचे अन, घ्यायचे आऊटपुटही, लक्षपूर्वक.. पाठ कर सर्कीट त्यांचा, वाजवीण्या, मस्त बोऱ्या, जागुनी तू… ताडपत्रीने छतावर, घाल आच्छादन टळाया, नित्य गळती.. काळजी घे, छप्परांची, आवळूनी, बांध दोऱ्या,जागुनी तू… ना तुझे हॉटेल आहे, मालकीचे, पण तरीही, शिकुन…

  • सलील – SALEEL

    पाऊस थांबलेला काठावरील गावी पंचायतीत गप्पा गोष्टीत शील गावी मतला असेल वा हा म्हणती जमीन याला ओसाड माळ बघण्या वाटे न थ्रील गावी शहरात काम नाही ना राहण्यास थारा जातात गांजलेले करण्यास डील गावी सोडून पिंजऱ्याला गेले उडून पक्षी आता न अनुभवाया तो स्वस्थ फील गावी शिवलेय तोंड वाटे प्रत्येक माणसाचे मिळते न ऐकण्या ते…

  • विसावा – VISAAVAA

    डोंगराच्या पायथ्याशी घे विसावा पावसा तृप्त जल प्राशून पृथ्वी ठेव पावा पावसा तिज समुद्रा भेटण्याची ओढ होती लागली भेटली ती काय द्यावा तुज पुरावा पावसा माणसांच्या कुंडलीतिल कर्मरूपी पिंजरा पत्रिका मांडे स्वतः जो मुक्त रावा पावसा वासनांची लाट अडवुन संयमाने तापता चिंब भिजल्या मृत्तिकेचा रंग ल्यावा पावसा केस सुकवी मेघमाला लोळणारे भूवरी तूच आता ऊन…

  • टिकाव – TIKAAV

    मम आत्म्यावर माझी प्रीती स्वभाव माझा नेणिवेतले आठवण्या ना सराव माझा मनापासुनी जे जे शिकले आठवेल मज सुयोग्य समयी सहज व्हावया उठाव माझा दिशादिशातुन वादळ येता पार व्हावया मला कधीही नडला नाही विभाव माझा कुटी हवेली शेत बंगला याहुन जिवलग काया माझी या जन्मातिल पडाव माझा मी न मांडला मी न मोडला फक्त पाहिला तुझियासाठी…

  • नागमोडी – NAAGMODEE

    पहाटे पहाटे मला गझल भेटे पहाटेस वेडे खरे नवल भेटे निसर्गास गाणे नवे ऐकवाया पहाटे खगाला धरा सजल भेटे दवाने भिजूनी सुगंधात खिरता पहाटे गुलाबी हवा तरल भेटे ऋतू पावसाळी गडद गडद न्यारा पहाटे निळ्याशा जळी कमल भेटे नशीली तराई निशा नागमोडी पहाटे पुन्हा पण वळण सरल भेटे