-
माती – MAATEE
तापुनी आक्रन्दतेना फक्त सोसे तप्त लाव्हा मूक माती मृत्तिका मूर्ती क्षमेची फाटते पण धरत नाही डूक माती का क्षमेची नाटकेही चाललेली माणसांची या धरेवर ती निसर्गा बांधलेली माणसासम ना करे हो चूक माती
-
कळसा – KALHASAA
गोठून आसवांचा मज भार होत आहे एकेक आसवाची घन गार होत आहे गारा भरून कळसा घेता कटीवरी मी विळख्यातुनी विजेचा संचार होत आहे गोष्टी कपोतवर्णी स्मरणात साठलेल्या वितळून त्या उन्हाने अंधार होत आहे ज्याचे तया कळावे केल्या किती चुका ते घेतात सोंग म्हणुनी व्यापार होत आहे अक्षर लुटून वाणी झरते खुशाल जेव्हा मी कापण्या मुखवटे…
-
सुतक – SUTAK
पाळते ना सुतक ताई बोलते बेधडक ताई ढोंग जेथे त्या तिथूनी निघुन येते तडक ताई सत्य शोधाया कळाया यत्न करते अथक ताई घाम गाळुन चिंब भिजवे तापलेली सडक ताई काल जी होती मुलायम आज झाली कडक ताई
-
जवस – JAVAS
पुनव ना मी अवस आहे ना कुणाची हवस आहे चढविशी का पाक मजवर तीळ ना मी जवस आहे
-
भूमीताय – BHUMEE TAAY
भूमीताय दिस उजाडल्यापासून तापू लागते. ढग पांढरे तपास बसलेत.एप्रिल आला. चैत्र येतोय. कोसळारे ढगांनो…. कुणाची ताय आहे ती कुणाची आय आहे ती घाल या माहात न्हाऊ तापली बाय आहे ती ….
-
स्वभाव – SWABHAAV
फुलाप्रमाणे कोमल सुरभित वज्रासम खंबीर स्वभाव मुक्तिपथावरच्या आत्म्यांचा शूर वीर अन धीर स्वभाव धर्म अहिंसा शाश्वत जगती बिंबविण्या आचरणातून मन वचने कायेतुन झळके शुद्ध अहिंसक मीर स्वभाव पुण्याईने मनासारखे घडते जेव्हा सारे छान जणु काचेच्या पात्रामधले मधुर सुवासिक क्षीर स्वभाव यौवन धन सत्तेची मदिरा चढते जेव्हा मस्तिष्कात उतरविण्या ती मादक धुंदी होतो वेडा पीर स्वभाव…
-
गोडवे – GODAVE
प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे.. असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे… झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम.. यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…