-
चुक्ती – CHUKTEE
केल्यावर तुज सक्ती मीही बाकी केली चुक्ती मीही खूप पाहिली वाट म्हणाया हवीच मजला मुक्ती … मीही नवल वाटते दगडाचीही केली होती भक्ती मीही स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वाढविली मम शक्ती मीही नाव ‘सुनेत्रा’ सिद्ध कराया कधी करितसे युक्ती मीही
-
सज्ज – SAJJA
सांजवेळ रम्य होत लाल भाळ जाहले भारतीय भू स वंदण्यास काळ जाहले भाळ काळ जाहलेय नमविण्यास शत्रुला कूट प्रश्न उलगडून मी गव्हाळ जाहले कंटकांस खात खात वर्तमान पचवुनी स्वागतास सज्ज शुभ्र पुष्पमाळ जाहले मौन घेतले जरी तयास आज त्यागुनी जाळण्यास वाजण्यास जाळ टाळ जाहले रंगरूप आरशात पाहताच रंगले रंगरंगुनी नशेत सान बाळ जाहले
-
विराम – VIRAAM
नशिबाची ना हुजरी मी रे;प्राक्तन बिक्तन गुलाम माझे .. म्हातारी ती गतकालातिल;आज तरुण ‘मी’ विराम,माझे … माजी बाला आजी तरुणी;भविष्यातली होते वृद्धा .. अवघ्या तरुणाईची आई;काळाला या सलाम माझे … बुद्धीजीवी ज्ञान वाटती;ज्ञानच लुटती ज्ञानासाठी .. कसणाऱ्यांच्या हाती बंदे!खणखणणारे छदाम माझे … त्रिलोकातली दौलत सारी…….हृदयी माझ्या भरून वाहे .. ब्रह्मांडातिल सुख शांतीमय;त्रिभुवनी पावन धाम माझे…
-
कथानुयोग(कथासंग्रह) एक दृष्टिक्षेप – KATHAANUYOG
आपले स्वरूप किंवा आपला स्वभाव जसा आहे तसा तो स्वीकारून भयमुक्त होऊन जर आपण त्यावर प्रेम केले तरच आपण आपल्याला लाभलेल्या मनुष्य जीवनाचा रसिकतेने आस्वाद किंवा उपभोग घेऊ शकतो. यातला उपभोग हा शब्द काही तथाकथित सुसंस्कृत लोकांना कदाचित खटकू शकतो, पण खरे पाहता येथे उपभोग आपण आपल्याला सहजपणे लाभलेल्या प्राकृतिक जगण्याचा घ्यायचा आहे. “कथानुयोग” हा…
-
प्रश्नचिन्ह (कथा) आस्वादात्मक समीक्षा – PRASHNACHINHA
शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेत आम्हाला एक कविता होती. “देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश देव देतो सुंदर हा सूर्य☀️, चंद्रही🌙 सुंदर सुंदर चांदणे पडे त्याचे ” हे सुंदर आकाश देवाचे आहे. या आकाशातला चंद्र, सूर्य चांदणेही मग देवानेच निर्माण केले आहे. असा सुंदर समर्पित भाव व्यक्त करणारी ही कविता. ही कविता चार-पाच वर्षांच्या कोवळ्या…
-
याचसाठी केला अट्टाहास(कथा) आस्वादात्मक समीक्षा – YAACHASAATHEE KELAA ATTAAHAAS
साहित्य कोणतंही असो, हिंदू धर्मियांचं असो, ख्रिस्ती धर्मियांचं असो, बौद्ध धर्मियांचं असो, मुस्लिम धर्मियांचं असो, आदिवासींचं असो, वैदिकांचं असो, श्रमणांचं असो, स्त्रीवादी, पुरुषवादी, ग्रामीण, अभिजनवादी वा प्रादेशिक असो त्या सर्वातून दिसणारं धर्माचं स्वरूप सापेक्ष असतं. … याचं कारण धर्म म्हणजे ज्यानं त्यानं स्वतःच्या प्रवृत्तीनुसार, कुवतीनुसार प्रकृती किंवा निसर्गाच्या हाकेला दिलेली साद असते. Nurture to Nature…
-
देऊळ कथा आस्वादात्मक समीक्षा – DEOOL
‘देऊळ ‘ ही प्रा. डी. डी. मगदूम यांनी लिहिलेली कथा रूढ अर्थाने एक समकालीन मराठी जैन कथा असली तरीही मला मात्र तिला एक नवकथा असे म्हणावेसे वाटते. ज्येष्ठ समीक्षक गंगाधर गाडगीळ आपल्या ‘ नवकथेचे स्वरूप ‘ या लेखात म्हणतात, ” वाङ्मयातील काही विशिष्ट प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या कथेला नवकथा हे नाव देणे अप्रस्तुत आहे, कारण आज…