-
पखरण – PAKHARAN
जाति : श्यामाराणी झुळुक पहाटे लहरत आली प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र फुलांची पखरण झाली धवल केशरी रांगोळीने भुई चिंबली रंगात पानांवरुनी ओघळल्यावर थेंब दवाचे टपटपल्यावर लोळुन घुसळुन त्यात स्वतःला भिजली माती गंधात मातीवरचे टिपण्या दाणे रंगबिरंगी पक्षी आले टिपता दाणे गाती गाणे जणू आकडे बसलेले ते अंकलिपीतिल अंकात एक पाखरू निळे त्यातले भुंग्यामागे उडू लागले दमून…
-
अंतरात आई – ANTARAAT AAEE
जाति : परिलिना अजूनही तुझी छबी अंतरात आई.. (धृ.पद) दूर कुठे जाहलीस तुला पाहते मी सांजवात लावुन तुजसवे बोलते मी सुगंध धूप दरवळे शोक दूर दूर पळे स्वप्न तुझे पूर्ण फळे अंगणात पुष्पांनी वाकली ग जाई .. दादांची सखी प्रिया होतीस तू माय नातवंडे तुला जणु दुधावरील साय वदन तुझे सुस्वरूप हास्य तुझे चंद्ररूप नेत्र…
-
टॅटू – TATTOO
बाई सुया घे गं दाभण घे …या जुन्या लोकगीताच्या चालीवर आधारित नवे गीत बाई सुया घे गं दाभण घे …. टॅटू गोंदवुन घ्या गं कुणी … टिकल्या घ्या कुणी ऐना फणी….(धृ. पद) कुरळ्या केसांच्या हौसाबाई डोकं धुवाया घ्या शिकेकाई दुखऱ्या फोडावर धोंडामाई लावा शेकुन बिब्बा बाई झाडाल वाडा मग बावन खणी … टिकल्या घ्या कुणी…
-
नीर झरा ग नीर झरा – NEER ZARAA G NEER ZARAA
गगन चुंबण्या उभ्या खड्या तुझ्याच अधरांवरुन कड्या मस्त नाचतो घेत उड्या खळखळ वाजत भरे घड्या घालत भूवर पायघड्या नीर झरा ग नीर झरा… जळी तरूंचे सांगाडे बाजुस शिंदीची झाडे त्यावर मेघांचे वाडे वीज कडाडुन ते पाडे ढगातून कोणा धाडे नीर झऱ्यास नीर झऱ्यास … कधी करितसे शांत जला बिंब दावण्या गवतफुला उडवुन अंगावर पाणी तृणपात्यांना…
-
विशुद्धमती – VISHUDDH MATEE
कोमल कुसुमांवरी रंगल्या उडते फुलपाखरू भृंगासम गुणगुणते गाणे चंचल मनपाखरू मधमाश्या मधुसंचय करिती बांधुन पोळे छान लोट सुवासिक वाऱ्यावरती धुंद केतकी रान आंबेराईवरून येते लहर सुगंध भरली काटेरी कुंपणावरीही रातराणी फुलली नीर व्हावया शीतल सुरभित वाळा माठातळी बंद पाकळ्यांमध्ये जपते परिमल चाफेकळी ग्रीष्माची चाहूल झळाळी मोद उधळते मनी कवीमनाच्या पऱ्या बसंती झुलताती अंगणी असा उन्हाळा…
-
चिद्घनचपला – CHIDDGHAN CHAPALAA
जाति : झपूर्झा हावभाव रे आवडले हास्य तापले सुंभ जळाले कातळकाया पाझरली पीळ सुटोनी कळ तुटली कातळातुनी वर आली भरून प्याला सांडू लागला काय जाहले सांग बरे निर्जरा ! कर्मनिर्जरा ! बाह्यरुपाला जे भुलले ते पाघळले ते काजळले शिकविण्यास त्या अंधांना घालित बसले कोड्याला खिळे ठोकुनी झाडाला ते झाड अडे कोड्यात पडे आग लाविता खाक…
-
गझल एक नाट्यगीत – GAZAL EK NATYAGEET
कवी मनाला सौंदर्याचे वेड असते. म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचे, स्थळाचे, किंवा व्यक्तीचे बाह्यरुपच नाही तर त्यातील अंतरंगाच्या सौंदर्याचा शोध घेण्यासाठीही कवी मन धडपडत असते. निसर्गातले गूढरम्य चमत्कार, घटना यांचा तळागाळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी कवी, कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक स्वतःच्या पद्धतीने सतत प्रयत्न करत असतात. कवीच्या सुप्त मनाला सतत अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याची ओढ असते. सृष्टीतील गूढत्वाचे कवी…