Tag: Marathi sahitya

  • स्याद्वाद शैली – SYAADVAAD SHAILEE (THE SEVENFOLD LOGIC)

    जिना बिलोरी लवचिक मजबुत जिना चढूया मजेत मजबुत वळणावरती मंचक झुलता जिना वळतसे गर्कन मजबुत वळणे वळसे घेता घेता जिना बनतसे अजून मजबुत स्याद्वादाची सलील शैली जिना पेलतो डोलत मजबुत टोक गाठुनी न्याहाळत भू जिना थबकतो वळून मजबुत वर्तमान अन भूत संगरी जिना आजपण तसाच मजबुत भविष्य लिहितो स्वतः स्वतःचे जिना म्हणे मी खरेच मजबुत

  • नाजुक तंतू – NAAJUK TANTOO (TENDER FIBERS)

    सालांमध्ये साल पावले वीसएकविस साल मला सरोवरे मी कैक पाहिली पहायचे पण दाल मला सदैव गाठी बसती तुटती नाजुक तंतू ताणून ग हलके हलके सोडव गुंता म्हणते आंतरजाल मला धवलगान वर्णांचा ऐवज मोक्षाचा सोपान खरा दिडदा दिडदा बोल सांडती रंगांनी प्रक्षाल मला जुनाच मुखडा नवा अंतरा म्हणता म्हणता सां सां ध प भूपाळीचे स्वर भक्तीमय…

  • ममत्त्व – MAMTTV (ATTACHMENT)

    गालगागा गाल गागा मोज मात्रा गा ल गा गा अंधश्रद्धा सोड मूढा सत्य आत्मा ढाल गागा नाव नाना अर्थ सांगे जो हवा तो घे उशाला साद देई मग पहाटे अंतरीचा ताल गा गा मी ममत्त्वाच्याच मोही म्हण हवे तर भावबंधन गात तुज जगण्यास मोदे शिकविते मी चाल गा गा लहरते रंगीत थंडी देतसे संगीत निर्झर…

  • वेठबिगारी – VETH BIGAAREE (BONDED LABOUR)

    कुदळ फावडे नांगरधारी शेतकरी हिरवे सोने कसून तारी शेतकरी प्राणपणाने जवान लढती देशाचे घास मुखीचा त्यांना चारी शेतकरी रोखठोक द्या हिशेब अमुच्या रक्ताचा म्हणतो आहे नको उधारी शेतकरी स्वार्थांधांच्या देता हाती न्यायतुला तोलायाला पडेल भारी शेतकरी शिवार फुलवित करण्या भक्ती मातीची दिल्लीच्या जातो दरबारी शेतकरी रेशनचे तांदूळ मिळाया अजूनही स्वस्त दुकानी करतो वारी शेतकरी सारा…

  • सम्यक शेती – SAMYAK SHETEE (COMPLETE AGRICULTURE)

    छेडते न वीणेच्या तारा गाण्यासाठी गाण्यासाठी शीळ घालता सुरभित वारा गाण्यासाठी गाण्यासाठी तबला पेटी हवी कशाला साथीला मम ढग आणिक खग जलदांमधल्या झेलिन धारा गाण्यासाठी गाण्यासाठी ताडमाड नारळी पोफळी गगन चुंबिती गातो निर्झर खुणावतो आसमंत सारा गाण्यासाठी गाण्यासाठी तापतापुनी धरा जलाशय ढगोढगी बाष्पाची दाटी वाफेचा उतरूदे पारा गाण्यासाठी गाण्यासाठी रान जिवाचे करून फुलविन सम्यक शेती…

  • चुडामणि – CHUDAAMANI (CREST JEWEL)

    बकुळ फुलांची भरली ओंजळ सांडत आहे सुख शांती अन हर्ष अंतरी गाजत आहे कनक पाटल्या कंच पाचु वन कंकण किणकिण नजरबंद मम नजराणा मन पाहत आहे कुरळ कुंतली रत्न चुडामणि काजळ नयनी अधरी वेणू हळदी रंगी वाजत आहे कानी कुंडल जास्वंदीचे हलती डुलती भाळी कुंकू चंद्रकोर चिर शोभत आहे गाणे गाता खळखळ निर्झर कोकिळ भारद्वाज…

  • रजक – RAJAK (LAUNDRESS)

    शेतकऱ्याला कष्टकऱ्याला पिळवुन घेशी, घडा भराया कर्मांचा शंभर वर्षे सरली भरली बघणाऱ्यांची, धडा लिहाया कर्मांचा परीट धोबी रजक अगस्ती नावे मिरवित, बडव बडवती रोज धुणे पिळुन सुकवती दोरीवरती ऊन हवेने, चुडा फुटाया कर्मांचा नागिण फिरते विहिरीवरती ये बाहेरी, वारुळ फोडुन सळसळुनी नागोबा होऊन डोल रे फणा उभारुन, खडा पडाया कर्मांचा चपळ लेखणी ज्वलंत प्रश्नांवरती लिहिते,…