Tag: Marathi sahitya

  • पूर्वभव – PURVABHAV (PREVIOUS BIRTH)

    थबकुनी अंदाज घेतो शेर माझा आगळ्या डौलात येतो शेर माझा भावनांचे मेघ तपुनी थंड होता अंतरी चाहूल देतो शेर माझा पाहता मुनीराज ध्यानी मौन विपिनी बैसतो त्यांच्यापुढे तो शेर माझा कैकवेळा खोडुनी मी परत लिहिता पूर्वभव कुठला स्मरे तो शेर माझा जाग येता मज पहाटे शांत समयी शिखरजी यात्रेस नेतो शेर माझा

  • आत्महित – ATMAHIT (SELF HELP)

    काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या

  • गोडवा – GODVAA (SWEETNESS)

    मी मौनाशी मैत्री केली मौनातच मम आरोळी शब्दांसंगे खेळ कागदी भरते कर्मांची झोळी अधरांवर तर्जनी न नाचे साक्षीभावे अचल उभी मकरंदी गोडवा गुळाचा निर्जरेस नव चारोळी

  • मधुरस – MADHURAS (SWEET JUICE)

    मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो

  • तिप्प – TIPPA(SATISFIED)

    आज मला मी म्हणे सुंदरा माळ भावना गजऱ्यामधला परिमल उधळे तृप्त भावना मन शीतल कर चिंब भिजाया शुष्क भावना तपून अश्रू पिंडी झाल्या रुक्ष भावना दुबळे मन जर होते हळवे वात्सल्याने देत सावली व्यक्त करतसे वृक्ष भावना शुद्ध अशुद्धाची चर्चा बस गडगडणारी धवल घनांना सजल बनवती कृष्ण भावना किती जागुनी गस्त घालशिल स्वतः स्वतःवर नीज…

  • वेळ – VEL(TIMING)

    ही न वेळ असे खरी वाट पाहण्याची…. हीच वेळ असे खरी भेटाया जाण्याची… गप्पांच्या मैफलीत रंग नवे भरण्याला … हृदय उघड उघड मना काव्य नित्य झरण्याला …. बोल फक्त बोल गात गुणगुणता काही… अंतरंग सांगतेय गुज मला बाई….

  • अत्तर घन – ATTAR GHAN (CLOUDS OF PERFUME)

    अधर सहज मिटलेले रेषेवर जुळलेले आघात न कसलाही प्रतिघातच उठलेले पर्णांचे शुष्क थवे वाऱ्यावर उडलेले पानातुन तांबुस दो मौन तुझे हसलेले स्वप्नातच स्वप्न जणू नवल खरे घडलेले क्षितिजावर सांज उभी अत्तर घन झरलेले गा गा गा गुणगुणता उत्तर मज सुचलेले जगण्याची आस नशा जीव जगी रमलेले नीर सुनेत्रात पुन्हा पापण दल हललेले