-
बाण वायू – BAAN VAAYOO (AIR ARROW)
ग्रास मुखातिल उदरी नेई निळसर हिरवा प्राण वायू रक्ताभिसरण सहज करितसे लाल तांबडा व्यान वायू विनय नम्रता सौजन्यादि भाव वाहता अंतरातले मस्तिष्काला शांत ठेवतो धवल निर्मल उदान वायू दृष्टी वाचा तनमन बुद्धी इंद्रियांसह तोल साधण्या देहामधल्या मळास ढकले कृष्ण श्यामल अपान वायू उदरामधले अन्न पचविण्या लोहाराचा जणू भाता अग्नी फुलवे नाभीमधला पीतवर्णी समान वायू भूमीवरती…
-
टाळी – TAALHEE (HANDCLAP)
डोळ्यांत आसवांची आली भरून घागर अन पापण्यांत स्वप्ने जगली झरून घागर भरुनी पुन्हा पुन्हा ती करते रिती स्वतःला झाल्यावरी रिकामी येते तरून घागर पश्चिम झळाळणारी तांब्यापरी बघूनी मज माय पाठवीते छोटी घरून घागर मम घागरीत सागर आहे मधुर जलाचा मी रम्य घाट चाले डोई धरून घागर घन तापताप तपुनी देता विजेस टाळी सांजेस मेघमाला ओते…
-
चुक्ती – CHUKTEE (SETTLED)
-
सज्ज – SAJJA (READY)
सांजवेळ रम्य होत लाल भाळ जाहले भारतीय भू स वंदण्यास काळ जाहले भाळ काळ जाहलेय नमविण्यास शत्रुला कूट प्रश्न उलगडून मी गव्हाळ जाहले कंटकांस खात खात वर्तमान पचवुनी स्वागतास सज्ज शुभ्र पुष्पमाळ जाहले मौन घेतले जरी तयास आज त्यागुनी जाळण्यास वाजण्यास जाळ टाळ जाहले रंगरूप आरशात पाहताच रंगले रंगरंगुनी नशेत सान बाळ जाहले
-
विराम – VIRAAM (PERIOD )
नशिबाची ना हुजरी मी रे;प्राक्तन बिक्तन गुलाम माझे .. म्हातारी ती गतकालातिल;आज तरुण ‘मी’ विराम,माझे … माजी बाला आजी तरुणी;भविष्यातली होते वृद्धा .. अवघ्या तरुणाईची आई;काळाला या सलाम माझे … बुद्धीजीवी ज्ञान वाटती;ज्ञानच लुटती ज्ञानासाठी .. कसणाऱ्यांच्या हाती बंदे!खणखणणारे छदाम माझे … त्रिलोकातली दौलत सारी…….हृदयी माझ्या भरून वाहे .. ब्रह्मांडातिल सुख शांतीमय;त्रिभुवनी पावन धाम माझे…
-
कथानुयोग(कथासंग्रह) एक दृष्टिक्षेप – KATHAANUYOG (APPRECIATIVE CRITICISM)
आपले स्वरूप किंवा आपला स्वभाव जसा आहे तसा तो स्वीकारून भयमुक्त होऊन जर आपण त्यावर प्रेम केले तरच आपण आपल्याला लाभलेल्या मनुष्य जीवनाचा रसिकतेने आस्वाद किंवा उपभोग घेऊ शकतो. यातला उपभोग हा शब्द काही तथाकथित सुसंस्कृत लोकांना कदाचित खटकू शकतो, पण खरे पाहता येथे उपभोग आपण आपल्याला सहजपणे लाभलेल्या प्राकृतिक जगण्याचा घ्यायचा आहे. “कथानुयोग” हा…
-
प्रश्नचिन्ह (कथा) आस्वादात्मक समीक्षा – PRASHNACHINHA (APPRECIATIVE CRITICISM)
शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेत आम्हाला एक कविता होती. “देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश देव देतो सुंदर हा सूर्य☀️, चंद्रही सुंदर सुंदर चांदणे पडे त्याचे ” हे सुंदर आकाश देवाचे आहे. या आकाशातला चंद्र, सूर्य चांदणेही मग देवानेच निर्माण केले आहे. असा सुंदर समर्पित भाव व्यक्त करणारी ही कविता. ही कविता चार-पाच वर्षांच्या कोवळ्या…