-
घटना ग्रंथ – GHATANAA GRANTH
पंचोळी … घटना घटना असुदे अथवा घट पट त्यांस असावा प्रकृतिचा तट मातीवर संस्कार करूनी घट संस्कारित कुंभाराच्या हाताचा आकार झेलूनी मृत्तिकेतले उपादान साकार जाहले… तीन शेरांचे मुक्तक ..ग्रंथ काल खेळली रंग लेखणी मस्त खरा आज चाटुनी कोप नाचरा फस्त खरा काय शिकविते गझल ओळखू सार बरे मित्र जवळचा ग्रंथ सत्य आश्वस्त खरा रंगवायला चित्र…
-
कोसला – KOSALA
प्रीतकी जंजीर हो या अभिमानका खंजीर, भाषा ब्रह्मांडकी हो या पिंडकी, धर्म राष्ट्रका हो या देशका,अथवा प्रादेशीक.. हृदयका धर्म प्रेम होता हैं … दोन रुबाया १) कोसला.. होऊन फुलपाखरु मकरंद प्राशाया कोसला धडपडे कोष फोडुनी सुटण्या घोळात रुबाई मात्रांच्या पण येई स्वातंत्र्य जपाया मार्ग स्वतःचा घेई… २) पाकळी मृदु पाकळी मनाची प्रेमे उलगडता दवबिंदुत भिजुनी…
-
वाह व्वा – VAAH VVA
वाह व्वा वाह.. व्वा … या मुलींना सा.. र… काही कळत कळत …नकळत जुळत जातं … नकळत जुळत जुळत मळत पण जातं … म्हणून सांगते मुलींनो …आणि मुलग्यांनो , फार मळू … देऊ नका… वळायचं तेवढं वळून घ्या… कारण नंतर किती रडा …किती जोडा … उपयोग नाही होणार… ज्याच्या त्याच्या कर्मांचा हिशेब… चुकता मात्र करावाच…
-
अप्पदिवो – APP-DIVO
अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया
-
हसूत पसरट अथवा तिरके – HASOOT PASARAT ATHVAA TIRAKE
हसूत पसरट अथवा तिरके आम्ही स्वतःशी वा कोठेही घेऊ काळजी स्वतः स्वतःची .. वा जगताची कशास चिंता मग जगताची सार मिळो वा सांबाराचे मारू भुरके हसूत पसरट अथवा तिरके उपदेशाचे किती फवारे तुमचे तुम्हा लखलाभ होऊदे सतत हसावे अन हसवावे कुणी न उरले आता परके हसूत पसरट अथवा तिरके एकांतीही हसून घ्यावे पोट भरावे ..…
-
उत्तम मार्दव – UTTAM MAARDAV
कोमल जल खडकांस कापते तैसे मार्दव सृष्टी जपते… फुलाप्रमाणे मृदू बनावे गुणानुरागी सुरभित व्हावे….. हृदयपाकळ्या उमलुन येता झुळकीवर हलके लहरावे,…. चंद्रकिरण प्राशून कुमुदिनी जैसी फुलते … मुनीमनातील वचने स्मरुनी आपण गावे…. आजचा दिवस उत्तम मार्दव…. सर्व साधर्मि बंधु-भगिनींस उत्तम मार्दव धर्माच्या हृदयपूर्वक शुभेच्छा !!!
-
तुझे माझे – TUZE MAAZE
तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये एक कौलारू घर होते प्राजक्ताच्या झाडाखाली मोती-पोवळ्यांचे सर होते तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये व्हिलन बिलन कधीच नव्हता धो धो कोसळणारा फक्त वेडा पाऊस होता तुझ्या माझ्या गाण्यामध्ये दुःख उसासे कधीच नव्हते दवात भिजल्या भाव फुलांचे एक सुंदर गाव होते तुझ्या माझ्या प्रीतीमध्ये अन्तर शून्य शून्य होते अंतरीच्या पाण्यामध्ये तुझे प्रतिबिंब होते तुझ्या माझ्या…