Tag: Mukt-chhanda

  • उत्तम मार्दव – UTTAM MAARDAV (supreme humility)

    कोमल जल खडकांस कापते तैसे मार्दव सृष्टी जपते… फुलाप्रमाणे मृदू बनावे गुणानुरागी सुरभित व्हावे….. हृदयपाकळ्या उमलुन येता झुळकीवर हलके लहरावे,…. चंद्रकिरण प्राशून कुमुदिनी जैसी फुलते … मुनीमनातील वचने स्मरुनी आपण गावे….  

  • सगुण – SAGUN (virtuous)

    सगुण असो वा निर्गुण तो रे प्रीत तयावर जडली माझी … जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच मूर्त त्यातून घडवली … वात्सल्याचा भाव भरोनी निर्गुण प्रतिमा सगुण जाहली … तीन रत्नयुत ज्योत दिव्याची अंतर्यामी एक उजळली …

  • मोजमाप – MOJAMAAP (measurement)

    गान हृदयीचे वा देहाचे ते गाणे असते इंद्रियांच्या शक्तीचे ते मोजमाप असते अपुले अपुले गाणे सुंदर आपण गावे द्यावे गाता गाता जगत अलौकिक दिपवुन टाकावे कधी न करावी चोरी आपण दुसऱ्यांच्या पैशांची स्वकष्टाने धन कमवावे मिळेल सुख शांती वंशवेल वाढण्या आपुली कुटुंब जपणे धर्म देशाचे स्वातंत्र्य टिकविण्या अभिव्यक्ती धर्म

  • एक कोकरू – EK KOKAROO (a lamb)

    एक कोकरू हुंदडणारे … पण आकुळलेले काळ्या डोळ्यांमधे वेदना … होते बावरलेले … कुणी अनामिक अनोळखी जरी…. कुशीत अलगद शिरले … कवळुन घेता प्रेमभराने शांत शांत जाहले… तृप्त अनामिक तृप्त कोकरू … नेत्र मेघ भरले … जलदांमधुनी थेंब टपोरे गाली झरझरले …. अधरांवरती हलके हलके …. हसू निरागस फुलले …

  • तुझे माझे – TUZE MAAZE

    तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये एक कौलारू घर होते प्राजक्ताच्या झाडाखाली मोती-पोवळ्यांचे सर होते तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये व्हिलन बिलन कधीच नव्हता धो धो कोसळणारा फक्त वेडा पाऊस होता तुझ्या माझ्या गाण्यामध्ये दुःख उसासे कधीच नव्हते दवात भिजल्या भाव फुलांचे एक सुंदर गाव होते तुझ्या माझ्या प्रीतीमध्ये अन्तर शून्य शून्य होते अंतरीच्या पाण्यामध्ये तुझे प्रतिबिंब होते तुझ्या माझ्या…

  • एक साधी सरळ कविता – EK SAADHEE SARALH KAVITAA

    एक साधी सरळ कविता माझ्या तुमच्या लेकींसाठी अधिक सुख मिळूदे भावास म्हणून झटणाऱ्या बहिणींसाठी …. भाऊ जपतो आईला आई त्यांच्या बापाला आईबाप जिवंत ठेवतात लेकींसाठी माहेराला…. माहेराच्या वाटेवरचे काटे कधी बोचत नसतात सासरघरची कळ्या फुले जिवाला जीव लावत असतात…. सासर असतं लेकींसाठी काम धाम करण्यासाठी हातावरच्या रेषांना सुरेख वळण देण्यासाठी….    

  • “पहिला पाऊस” – “PAHILAA PAAOOS”

    पहिला पाऊस पहिलं प्रेम, प्रेम कसलं फसवा गेम. . किती ताणलं धनुष्य तरी, कवी बाळाचा चुकतो नेम… “पहिला पाऊस पहिलं प्रेम” कुणीतरी कवी म्हणतो. . पावसावरती कविता रचत…. कल्पनेतच प्रेम करतो! कवी कल्पना सुंदर असतात ; ह्रुदयमधलं झुंबर असतात !! वारा येतो झुळूक येते . . झुंबर किणकिण गाणे गाते …. कवी वेडा वेडाच असतो,…