Tag: Muktak

  • भगवती – BHAGAVATEE

    घनतमी किती या संहार जाहला जरी प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी मन खरे मला हे सांगून सांगून बघे भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी झरणार शब्द घन दाटून येता हृदये श्रावणी धनाची लयलूट करूया हरी मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)

  • माग..डब्या – MAAG…DABYAA

    तीन शेरांचे मुक्तक … माग यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते माग शोधुनी काढायाला पी जे मनास वाटे ते चिखलामधले अगणित काटे दंश कराया टपलेले माग त्यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते भरला प्याला सांडूदे तव भिजण्या सारे शेर तुझे माग वाचुनी काढायाला पी जे मनास वाटे ते दोन शेरांचे स्वर काफिया मुक्तक……

  • विठ्ठल – VITHTHAL

    सूर मुरलीचे निळ्याचे गुंजले रानात साऱ्या ताल तबल्याचे घनाचे रंगले रानात साऱ्या सावळ्या या विठ्ठलाचे रूप सुंदर भावलेले पाहुनी वेडावले जन नाचले रानात साऱ्या

  • सगुण – SAGUN

    सगुण असो वा निर्गुण तो रे प्रीत तयावर जडली माझी … जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच मूर्त त्यातून घडवली … वात्सल्याचा भाव भरोनी निर्गुण प्रतिमा सगुण जाहली … तीन रत्नयुत ज्योत दिव्याची अंतर्यामी एक उजळली …

  • बनेन दाता – BANEN DATA

    उत्तम शुचिता धर्म ओळखुन नमू जिनाला मर्म ओळखुन पर्युषण हे पर्वच प्रिय मज बनेन दाता कर्म ओळखुन

  • शीळ – SHEEL

    श्रावणातलया नीळ घनातिल रिमझिम जल बरसे सहज सुटोनी पीळ मनातिल रिमझिम जल बरसे मोरपिसारा फुलवुन नाचे मयुर गवतावरी पडता कानी शीळ बनातिल रिमझिम जल बरसे

  • स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE

    सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न  देखणे झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे