इतुके लिहुनी नकोस टाकू टाकुन टाकुन दमशील ग इतुके गझले नकोस झाकू झाकुन झाकुन दमशील ग वाकून तू ग करिशी कामे दिवसरात्रभर किती किती इतुके बाई नकोस वाकू वाकुन वाकुन दमशील ग
असे नित्य स्वाध्याय पंचेंद्रियांचा खेळ वचन मन काय पंचेंद्रियांचा दोन कान दो सुनेत्र शुद्ध भावना नको धरू तू पाय पंचेंद्रियांचा
मनात सुंदर काही येता बिंब उमटते त्याचे नयनी .. नयन नीर जणु शांत जलाशय नैया फुलवारी तनु अवनी धुके मलमली लहरत झुलते अंगांगावर फुलवित काटे रिक्त पिंजरा मुक्त पक्षिणी इंद्रधनूवर निळसर गगनी
जीव स्वयंसे नाहि हरता ना डर लगता शरीर से वो नाता रखता ना डर लगता पुछताछ करनेको किसकी कुछ कुछ पाकर जब जब खुद वो खुदसे डरता ना डर लगता
हौदात जलावर धरता साय कधी पाहून सुखाने हसते माय कधी ती चंचल बाला बनुनी खळखळता पाऊस उतरतो धरण्या पाय कधी
कशास आता जाबसाल ते रोजरोजचे उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे