-
किरमिजी – KIRAMIJEE
मुक्तक… किरमिजी लाल केशरी बिंब किरमिजी गाज समुद्री चिंब किरमिजी कफास करण्या जर्जर विरुनी रक्तवर्ण डाळिंब किरमिजी गझल … किरमिजी भगवेपण केशरी किरमिजी गाज समुद्री सरी किरमिजी नदी किनारी वाहत आली बांबूची टोकरी किरमिजी चल बाजारी विकून येऊ डाळिंबे डोंगरी किरमिजी हृदयासाठी हितकर असते कुळिथाची भाकरी किरमिजी गाई गुरांना वळवुन आणी कृष्णाची बासरी किरमिजी
-
जीवस्व – JEEVASWA
मुक्तक … जीव जन्म कुपात न सुपात भू वर धरणीवर अश्विनात भू वर हस्ताच्या कोसळत्या धारा जीव झळकला तमात भू वर ….. गझल … जीव स्वरूप जन्मासाठी सूप निवडले दिवा लावण्या तूप निवडले चुस्त काफिया म्हणून गझले मंडुकास प्रिय कूप निवडले अर्घ्य द्यावया भगवंताला भाव सुगंधी धूप निवडले लष्कर पापांचे जाळाया जिनानुयायी भूप निवडले मातृधर्म…
-
दणका – DANAKA
दोन मुक्तके दणका .. सरळ जिवाचा मणका बिणका गरम भाकरी झुणका बिणका येच एकदा खाण्यासाठी मम सोट्याचा दणका बिणका गुलगोखरू ….. फुलपाखरू फुलपाखरु चल ये धरू फुलपाखरु बाळ्या कुणी म्हणताच ग गुलगोखरू फुलपाखरु
-
वाडा – VADAA
जाहला गोठ्यात वाडा द्रव्य साही खांब भारी अंगणी गातात पक्षी डोंगरी बाबू जमाली हे उसाचे शेत गाते पूर्व पश्चिम जोडणारी उत्तरेला दक्षिणेची साथ मिळता सौख्य दारी
-
गिरी धन – GIREE DHAN
चलन वलन सत्य शाश्वत आत्मा साक्षी मम अचल चलावर गिरी धन आत्मा साक्षी मम ललल ललल गाल गालल गागा गागा लल लगावली मात्र भूजल आत्मा साक्षी मम
-
राजकन्या – RAJ KANYA
मुक्तक … प्रेमासाठी ती आसुसली ..एक राजकन्या प्रीतीच्या स्पर्शाने उठली …एक राजकन्या स्पर्शालाही महाग केले ..धर्म कसा वैरी माणुसकी जपणारी असली …एक राजकन्या मुक्तक… पाऊस जोगव्याचा सर जोगव्यात न्हाली शांतीत रंग भिजले सर लाडवात न्हाली हंडे भरून सांडे सुख कोवळ्या उन्हाचे ओतून धान्यराशी सर सांडव्यात न्हाली
-
सद्दी – SADDEE
ही जरी फोफावली कांही दुकाने जिद्दी पुरी तीच ती काढेन रद्दी उलथवूनी सद्दी पुरी या चला मांडून उकलू प्रश्न जे जे भंडावती सत्य धर्मी मी सुनेत्रा मिथ्य झटके रद्दी पुरी