-
शून्य शून्य – SHOONYA SHOONYA
आत्म्यात बिंब अपुले मी नित्य पाहतेरे आत्म्यात शुद्ध भावे मी सत्य पाहतेरे जिनबिम्ब दर्शनाने मी धन्य धन्य झाले किमया तुझी बघुनी मी शून्य शून्य झाले ….. भरता भरता बुडते घागर भरून वरती येते तरंगते पाण्यावर हलके तरून वरती येते निवांत जीवनगाणे आता गाण्यासाठी जगते एक एक क्षण जगून जगून घ्यावा जगण्यासाठी तरते … एक रुबाई…
-
छडी – CHHADEE
अंध गुढीची छडी अंध पिढीची छडी दे दे फेकूनिया अंध रुढीची छडी
-
मार्जार कुंडल्या – MARJAR KUNDALYA
कुंडल्या .. नित्य धुते मी कैक कुंडल्या कधी जलाने .. कधी हवेने . कधी शब्दांतील काव्यरसाने मार्जार पंथ .. मार्जार पंथ भारी भलताच कार्यकारी याची भवे सुटाया अंतीम हीच वारी
-
फुले जुईची – FULE JUICHEE
नाजुक कोमल फुले जुईची नाजुक सुरभित फुले जुईची वारा वाहे झुले पहाया नाजुक शीतल फुले जुईची
-
जैन पारा – JAIN PAARAA
मुक्तक – पाट्याचा पारा वाट्याला आले, तेच वाटते बाई.. वाटाया मिरच्या, वरवंट्याची घाई.. कंकणे वाजता, किणकिण ठाई ठाई.. पाट्याचा पारा उतरत उतरत जाई.. रुबाई – जैन संस्कृती आत्महितास्तव परहित करुनी गगन चुंबते जैन संस्कृती हृदयामधली प्राकृत बोली अधरी जपते जैन संस्कृती घन मालांतुन उदक वर्षते चिंब भिजविण्या सुकल्या गात्रा उगाळेन चंदन प्रीतीचे सहज जुळाव्या अक्षर…
-
शब्दमेळ – SHABD-MEL
शब्दखेळ मी रोज मांडते नवाजुना शब्दमेळ अन ओज सांडते नवाजुना नित्य डोलते भार पेलण्या जगावया शब्दकेळ ना बोज कांडते नवाजुना
-
आत्महित – ATMAHIT
काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या