Tag: Muktak

  • सुंदरता – SUNDARTAA

    मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती

  • गडे – GADE

    कप अन बशीला सांग गडे कारण पिशी का भांग गडे शब्दच अडूनी मूक बसे काव्य न कधी विकलांग गडे लगावली – गागा/लगागा/गाललगा/

  • गरे वाटण्या – GARE VAATANYAA

    विसरुन जा ते असे कुणाला म्हटले तरिही आयुष्याशी बोलू द्यावे .. बरे वाटण्या फणस खोबरी वर काटेरी सोलायाला मदत विळ्याला करण्यासाठी .. गरे वाटण्या बरे वाटता गरे वाटता झरे वाहती हृदयामधले ऊर मोकळा .. होतो नकळत अंतरातुनी उमलुन येतो अभिनय उपजत खऱ्यांपुढे पण खरे वागणे .. खरे वाटण्या

  • काईट्स – KITES

    ओल्डन हाईटस गोल्डन बाईटस दे वेअर फ्लाईंग सोल्डन काईट्स

  • जिवलग – JIVALAG

    व्यक्त कराया भावभावना गझल लिहावी काफियातल्या अलामतीला जपत लिहावी दोस्ता जैसा रदीफ जिवलग शान वाढवी गझल कुणीही मनात गुणगुण करत लिहावी

  • चिंधी संधी – CHINDHEE SANDHEE

    चिंधी संधी….. (दोन मुक्तके) मला हवी तर मिळेल मजला संधी बिंधी कशास बांधू जखमेवरती चिंधी बिंधी रक्त सांडुदे म्हणून करते कानाडोळा तुला वाटते तशी न मी रे अंधी बिंधी … इच्छा आहे जगावयाची म्हणून मी या जगती आहे मरेन केव्हातरी पुढे मी तुजसाठी पण संधी आहे मरावयाची असली चिंधी संधी मजला नकोच आहे इच्छेविन मज मारायाची…

  • मंत्र – MANTRA

    अक्षर बीजांमधुनी उमटता मंत्र हृदय मंदिरी हवे कशाला कर्मकांड अन तंत्र हृदय मंदिरी जरी मोजुनी मात्रा लगक्रम यंत्री भरला तरी विशुद्ध भावांविन ना चाले यंत्र हृदय मंदिरी