-
पदावर्त – PADAAVART
पायाने जे उडवे पाणी त्या यंत्राला पदावर्त म्हणती अटीविना जे प्रेम करू वा कर्म करू ते विनाशर्त म्हणती दामाविन जी वाटसरूंना जल पाजे ती खरी पाणपोई भुकेजल्यांचे उदर प्रसादे तृप्त करे त्या सदावर्त म्हणती
-
नांगर – NAANGAR
आयुष्याची माती केली तूच स्वतः कबूल कर ही खुल्या मनाने चूक अता गच्च ढेकळे घट्ट जाहली वाळुनी ग कुणी फोडली फिरवुन नांगर जाण अता
-
माती – MAATEE
तापुनी आक्रन्दतेना फक्त सोसे तप्त लाव्हा मूक माती मृत्तिका मूर्ती क्षमेची फाटते पण धरत नाही डूक माती का क्षमेची नाटकेही चाललेली माणसांची या धरेवर ती निसर्गा बांधलेली माणसासम ना करे हो चूक माती
-
जवस – JAVAS
पुनव ना मी अवस आहे ना कुणाची हवस आहे चढविशी का पाक मजवर तीळ ना मी जवस आहे
-
गोडवे – GODAVE
प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे.. असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे… झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम.. यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…
-
कामे – KAAME
इतुके लिहुनी नकोस टाकू टाकुन टाकुन दमशील ग इतुके गझले नकोस झाकू झाकुन झाकुन दमशील ग वाकून तू ग करिशी कामे दिवसरात्रभर किती किती इतुके बाई नकोस वाकू वाकुन वाकुन दमशील ग
-
स्वाध्याय – SWAADHYAAY
असे नित्य स्वाध्याय पंचेंद्रियांचा खेळ वचन मन काय पंचेंद्रियांचा दोन कान दो सुनेत्र शुद्ध भावना नको धरू तू पाय पंचेंद्रियांचा