थाळीभवती कितीक चमचे
तू तर काटेपळी …
किती हुडकिशी तव काट्यांनी
या थाळीच्या तळी ?
पळी रुपेरी म्हणे वाढप्या,
“शिकार दिसते बरी!
चिनी जपानी खाद्यामधली
जाड शेवई खरी”
“तर्र मद्यपी अंधारातही
चोरतील ग तुला”
म्हणे वाढपी पळीस टोचऱ्या
“नकोस टोचू मला!
भुलून गेलो तुज पुसताना
तुझिया रंगावरी,
खरी तरतरी दिसे सुंदरी
माझ्या गालावरी”