काटेवांग्यापरी – KAATE-VAANGYAAPAREE


काटेवांग्यापरी काकडी हट्ट केवढा धरी
तिखट मिठाचे सारण करुनी भरना तू अंतरी

चूल पेटवून ठेव भगूणे
तेल घाल तू अदमासाने
कडकडनाणाऱ्या  तेलामध्ये
घाल जिरे मोहरी

हिंग हळदीची घाल फोडणी
हलवुन फोडी उदक सोडुनी
खिरा काकडी वाळूक असुदे
वाफ तया दे खरी

लखलखणारे ताट धातुचे
भरले वाळूक वाढ चवीचे
ठेव जोडीला गोड लोणचे
जेवीन आज घरी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.