-
काढा – KADHA
भाव झळके मंत्र म्हणता टिपुन घे कोणास सांगू मंत्र टिपता कागदावर उचल दे कोणास सांगू चोरुनी मंत्रास करती कैद जाती गोत्रवेड्या मंत्र माझा फिरुन येता धुमस रे कोणास सांगू अर्थ देई जीवनाला रंग स्वप्नांना नव्याने एक काढा पंडिता मी बनविते कोणास सांगू रडकथांचा पुसुन पाढा भूतकाळातिल व्यथांचा इंद्रधनुषी रंग भर चित्रात मम कोणास सांगू वेगळेपण…
-
बुमरँग – BOOMERANG
नवरी मोजे नऊ दिवस नवे नव्याचे नऊ दिवस घट मातीचा धान गहू उगवे वाढे नऊ दिवस चैत्रामधल्या नवरात्री वसंत नाचे नऊ दिवस मेंदी हळदी चुडा मणी झेल टोमणे नऊ दिवस कर्मकरंट्यांना बडगा नव्व्याणवचे नऊ दिवस हाव दागिन्यांना चाटे सोसत फटके नऊ दिवस कौटुंबिक हिंसाचारी मूळ पोसले नऊ दिवस सैल जिभांना आवळता पुरते जिरले नऊ दिवस…
-
भरते – BHARTE
समुद्रातले खारे पाणी मृगजळ लहरी फसवे पाणी दुःख मनीचे भरता नयनी गालावर कर्मांचे पाणी कृष्ण घनांना भरते येता जल आनंदाश्रूंचे पाणी तहानलेल्या मृगास फिरवी भ्रम दृष्टीचे कोरे पाणी लीड घ्यावया शिसे पचविते मम इच्छाशक्तीचे पाणी
-
कार्यकारणभाव – KARY KARAN BHAV
कार्यकारण भाव जाणू सृष्टिचे विज्ञान जाणू रोखण्यास्तव कर्मबंधन संवराचे कार्य जाणू जीव पुद्गल वेगळेपण अंतरी ध्यानात जाणू निर्जरेच्या साधनेला तपवुनी देहास जाणू धर्म जीवांचा अहिंसा हे सुनेत्रा सत्य जाणू
-
पाहुण्या – PAHUNYA
कुणी फुंकले कान कुणाचे कोणासाठी .. कुणी फुंकले रान कुणाचे कोणासाठी… कुणी फुंकले भान कुणाचे कोणासाठी.. कुणी फुंकले प्राण कुणाचे कोणासाठी… कुणी फुंकले पान कुणाचे कोणासाठी.. कुणी फुंकले बाव कुणाचे कोणासाठी … फुका लाटुनी गोल चढावे अव्वासव्वा .. कुणी फुंकले दान कुणाचे कोणासाठी … असे कोणते कर्म कराया देशासाठी.. कुणी फुंकले वाण कुणाचे कोणासाठी ……
-
हिवाळी चऱ्हाट – HIWALI CHARHAT
हिवाळी चऱ्हाट …मुक्तक रुबाई चारोळी तंबाखू .. हिवाळी ऊस सोयाबीन ज्वारी डोल डोले गव्हासंगे खुली शेती सुपारी डोल डोले हवा गाई दवारूनी दळे दळण मरुदेवी उभ्या वाफ्यात तंबाखू गवारी डोल डोले पानमळा .. बाजरी कपाशी मका पानमळा सावळा सावलीत बसुनी विडा खात चऱ्हाटा वळा टेकलेय क्षितिज जिथे शुभ्र घनांची शिडी कार्तिकात निर्झरात कृष्ण निळा सावळा…
-
बँड – BAND
चतुर्दशीला मनी नारकी युद्ध पेटले माजाचे तीव्र कामना अंगांगातुन रंग पेटले माजाचे मायाचारी कुटील नीती वक्रपणाने उचंबळे एक तडाखा बसता फुटुनी बीळ पेटले माजाचे सैरावैरा सर्प धावती शोधायाला नवी बिळे धपापणारे मूळ वाळके खोड पेटले माजाचे कुठे न थारा मिळता जुळता कात टाकुनी सळसळते लाळ साठवुन पिंक टाकता यंत्र पेटले माजाचे रसशाळा जणु इथे उघडली…