-
मयुरवाहिनी – MAYUR VAAHINEE
मयुरवाहिनी सरस्वती शारदा सुंदरी मयुरवाहिनी वीणा पुस्तक शीलधारिणी मयुरवाहिनी मोरपिसांच्या पिंछीचा मृदु स्पर्श मुलायम जागवितो तव सयी अंतरी मयुरवाहिनी काळ्या कोऱ्या पाटीवरती नऊ रसांच्या रेषा तोलत उभी लेखणी मयुरवाहिनी जललहरींचे वसन धवल घन दले गुलाबी कंच पाचु तनु मनगट हळदी मयुरवाहिनी चित्र रेखुनी फुलवेलीचे रंगबिरंगी कलम टेकवुन उभी पद्मश्री मयुरवाहिनी करात नाजुक स्फटिक मण्यांची माला…
-
हे दूध उतू गेले – HE DOODH UTOO GELE
त्यागाची इच्छा झाली हे दूध उतू गेले हृदयाला आली भरती हे भाव उतू गेले बादली बिनबुडाची ही भरणार कसे पाणी पापणीत भरता पाणी हे शब्द उतू गेले रचल्यास किती तू गोष्टी टाकून फोडणीला देताच अर्थ मी त्यांना हे रंग उतू गेले वासनेस येता भरते आकाश रडे स्फुंदे टरकावुन सोंगे ढोंगे हे तेज उतू गेले वासना…
-
हितकर – HITAKAR
लिहावयाला भिऊ कशाला प्रश्नचिन्ह मग लिहू कशाला लिहिणे करते मुक्त मनाला तर दुःखाने झरू कशाला अर्थ काढते सदैव हितकर शब्दांमध्ये फसू कशाला हृदय बोलते घडले सुंदर कुरूप भू ला म्हणू कशाला अंधश्रद्ध ही नव्हे “सुनेत्रा” श्रद्धेला मी डसू कशाला गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
सातबाराचा उतारा – SAAT BAARAACHA UTAARAA
पाच बारालाच लिहिला सातबाराचा उतारा माझिया हाती धरेचा सातबाराचा उतारा मी जरी शाईत काळ्या बुडवुनी टाकास लिहिते सप्तरंगी रंगला हा सातबाराचा उतारा काल होते चार बारा आज आहे पाच बारा बघ सहा बारा उद्याला सातबाराचा उतारा पुण्य मातीचे फळोनी मोतियासम अक्षरांचा मज मिळाला हा चिठोरा सातबाराचा उतारा टोलवीले कैक वेळा आज पण ते शक्य नाही…
-
गोमंतक – GOMANTAK
गोमंतक भू वरचा सुंदर स्वर्ग जणू आहे गोमंतक सृष्टीदेवीचा वर्ण जणू आहे काव्य झराया सदैव अनुकूल निसर्ग गोव्याचा गोमंतक काव्याचा आशय गर्भ जणू आहे अक्षरपंखी पुष्पपऱ्यांच्या सुगंध यात्रेची गोमंतक निर्मिती जादुई अर्थ जणू आहे अतिथी देवासमान मानुन तृप्त त्यांस करणे गोमंतक देशाचा हा तर धर्म जणू आहे सोनेरी भूमीत दिव्य या वनमंदिर शोभें गोमंतक आगम…
-
पानाभवती – PAANAA BHAVATEE
छुमछुम छुमछुम पैंजण वाजे पानाभवती उदक सुगंधी दवबिंदूंचे पानाभवती पदन्यास कलिकांचे पाहुन दिशा उजळता कुंदफुलांसम गझल डोलते पानाभवती चिंब वल्लरी हळद माखली फुले सुगंधी परिमल प्राशुन वारा नाचे पानाभवती झरझर विणते घालित टाके पाऊस धार सळसळणारे अक्षर पाते पानाभवती आरसपाणी पान भुईचे तयात अपुले बिंब पाहण्या गगन उभे हे पानाभवती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)
-
होम्बुज पद्मावती – HOMBUJ PADMAAVATEE
होम्बुज पद्मावती अंबिके पार्श्वयक्षि गुणखणी अंबिके धरणेंद्राची सखी प्रिया तू सगुण मूर्त साजिरी अंबिके भवसागर हा तरून जाण्या दिव्यदृष्टि दे मती अंबिके वीज भासतेस तू कांचनी लखलखती भूतली अंबिके मुखचंद्रासम तुझ्या उमलले कमलपुष्प काननी अंबिके गझल मात्रावृत्त (मात्रा १६)