Tag: Swar-kaafiyaa Ghazal

  • होम्बुज पद्मावती – HOMBUJ PADMAAVATEE

    होम्बुज पद्मावती अंबिके पार्श्वयक्षि गुणखणी अंबिके धरणेंद्राची सखी प्रिया तू सगुण मूर्त साजिरी अंबिके भवसागर हा तरून जाण्या दिव्यदृष्टि दे मती अंबिके वीज भासतेस तू कांचनी लखलखती भूतली अंबिके मुखचंद्रासम तुझ्या उमलले कमलपुष्प काननी अंबिके गझल मात्रावृत्त (मात्रा १६)

  • ब्लॅक – BLACK

    कचेरीत फ्लिटविकच्या होता कैद सिरिअस ब्लॅक कृष्णकला वर्गात कोंदटे रंग कळकट ब्लॅक हिप्पोग्रिफवर बसून झाला मुक्त काळ कुत्रा परतुन हॅरी गिळे मृदु चॉकलेट कडवट ब्लॅक चंदेरी काळवीट उमदा नाम प्रॉन्ग्ज त्याचे खरा धाडसी आश्रयदाता रात्र अनवट ब्लॅक हर्माइनी नि हॅरीची ही करामत जादुई निरोप घेई आनंदाने हात हलवुन ब्लॅक घटिका गोलावरती घुमवुन काळाला मागे तृप्त…

  • धूप जाळुनी – DHOOP JAALUNEE

    जपात रमले ध्यानी रमले तप केले मी शब्द जाळुनी राख जाहली मम् कर्मांची भाव भावना काव्य जाळुनी हृदय जाहले शांत जलासम बिंब प्रकटले सुंदर माझे आत्मस्वरूपी मग्न जाहले छळणारा मी भूत जाळुनी गाळ साठला तळी जलाच्या ओंजळ भरते शुद्ध जलाने नकाच फेकू दगड चुलीचे तुष्णा मिटली काष्ठ जाळुनी जात पात इतुकी ना मोठी त्याहुन मोठे…

  • बियाणे – BIYAANE

    पिकवीन सोनं मी गझलेच्या जमिनीमंदी झिजवीन जोडं मी गझलेच्या जमिनीमंदी रचून पोती शब्दधनाची येता गाडी अडवीन गाडं मी गझलेच्या जमिनीमंदी पेरायाला नक्षत्रांचे खरे बियाणे उसवीन पोतं मी गझलेच्या जमिनीमंदी प्रीती भक्ती शक्ती माझी सफल व्हावया उधळीन दाणं मी गझलेच्या जमिनीमंदी पाडायाला सरी मोतिया रिमझिम झिमझिम बसवीन जातं मी गझलेच्या जमिनीमंदी

  • मंझिल – MANZIL

    शब्द माझे सारथी अन शब्द माझे धन खरे हे शब्द माझे सारथी अन शब्द माझे बल खरे हे स्वच्छ करण्या मार्ग माझा हृदय माझे बिघडलेले शब्द माझे सारथी अन शब्द माझे जल खरे हे भेदण्या लक्ष्यास अवघड गाठण्या मंझिल नव्याने शब्द माझे सारथी अन शब्द माझे शर खरे हे चुंबण्या आकाशगंगा डुंबण्या पाण्यात निळसर शब्द…

  • शुभ्र लिली – SHUBHRA LILEE

    निशिगंधाच्या हारामध्ये लाल गुलाबांचा वावर ग शुभ्र लिलीची दले मलमली त्यात सुगंधाचा दरवळ ग कण्हेर कोरांटीचे कुंपण साद घालिते का चाफ्यास ते न शोधिते त्यातिल अत्तर जाग ऐकुनी ती सळसळ ग अरिष्टनेमीचे शोधाया कूळ गाडले जे मातीत मत्त गाढवे म्हणती दाबुन उमद्या घोड्या त्या खेचर ग मानस्तंभ तो ऐसा शोभे कषाय विरहित होऊनिया जिनमूर्तीचे घे…

  • ईद – EID

    चंद्र पाहिला अंबरात अन हृदयात उमटली ईद निळ्या समुद्री उधाणले जल हृदयात उमटली ईद गुलाब काही मनातले मी वहीत ठेवून जपले वही उघडता आज अचानक हृदयात उमटली ईद जुनी डायरी त्यातिल नावे कुठे हरवली आहेत पुस्तकात ती बसता शोधत हृदयात उमटली ईद चंद्रकोर नाजुक झुलणारी नाविक मी जणु नावेत भवती मासे फिरता सळसळ हृदयात उमटली…