-
मंझिल – MANZIL
शब्द माझे सारथी अन शब्द माझे धन खरे हे शब्द माझे सारथी अन शब्द माझे बल खरे हे स्वच्छ करण्या मार्ग माझा हृदय माझे बिघडलेले शब्द माझे सारथी अन शब्द माझे जल खरे हे भेदण्या लक्ष्यास अवघड गाठण्या मंझिल नव्याने शब्द माझे सारथी अन शब्द माझे शर खरे हे चुंबण्या आकाशगंगा डुंबण्या पाण्यात निळसर शब्द…
-
शुभ्र लिली – SHUBHRA LILEE
निशिगंधाच्या हारामध्ये लाल गुलाबांचा वावर ग शुभ्र लिलीची दले मलमली त्यात सुगंधाचा दरवळ ग कण्हेर कोरांटीचे कुंपण साद घालिते का चाफ्यास ते न शोधिते त्यातिल अत्तर जाग ऐकुनी ती सळसळ ग अरिष्टनेमीचे शोधाया कूळ गाडले जे मातीत मत्त गाढवे म्हणती दाबुन उमद्या घोड्या त्या खेचर ग मानस्तंभ तो ऐसा शोभे कषाय विरहित होऊनिया जिनमूर्तीचे घे…
-
ईद – EID
चंद्र पाहिला अंबरात अन हृदयात उमटली ईद निळ्या समुद्री उधाणले जल हृदयात उमटली ईद गुलाब काही मनातले मी वहीत ठेवून जपले वही उघडता आज अचानक हृदयात उमटली ईद जुनी डायरी त्यातिल नावे कुठे हरवली आहेत पुस्तकात ती बसता शोधत हृदयात उमटली ईद चंद्रकोर नाजुक झुलणारी नाविक मी जणु नावेत भवती मासे फिरता सळसळ हृदयात उमटली…
-
गोम्मट (हाऊस) – GOMMAT (HOUSE)
गोम्मट व्हिल्यावर घन झुकला पाण्याने भरल्यावर झुकला रंग पारवा निळसर ज्याचा असा जिना वळणावर झुकला वेल कळ्यांनी लदबदली अन शुभ्र फुलांचा मांडव झुकला भित्तीचित्रे कलापूर्ण ही पहा त्यातला मानव झुकला जलाशयावर बरसायाला रंग भरूनी श्रावण झुकला गोम्मट हाऊस मधुन कटता व्यंतर कपटी ! नागर झुकला गोम्मट हाऊस मधले प्रेम पाहुन ओला मोसम झुकला जेते इथले…
-
तुझ्याआधी – TUZYAA AADHEE
तुझ्याआधी घरी माझ्या पाऊस आला कुणासाठी घरी माझ्या पाऊस आला चिंब काया मोहराया रिंगण धराया चंद्रमौळी घरी माझ्या पाऊस आला अंतरीचे बोल बोली ऐकून टिपण्या देत हाळी घरी माझ्या पाऊस आला झरे ओढे वाहताती संगीत देण्या भरत पाणी घरी माझ्या पाऊस आला तावदाने वाजवूनी डोकावत हळू म्हणत गाणी घरी माझ्या पाऊस आला सुनेत्राला भेटावया इथे…
-
मुक्त हस्त चित्र – MUKT HAST CHITR
मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून…
-
हंगामा – HANGAAMAA
वृद्ध घालता धिंगाणा किती माजला हंगामा नाठी बुद्धी साठीला प्रत्यंतर बघ हा दंगा आजोबांच्या काठ्यांनी चोपचोपले अंगांगा आगडोंब वळ उठलेहे बोलव आगीच्या बंबा बंबाची वाजे घंटा पोरांनो थांबा थांबा गझल मात्रावृत्त (मात्रा १४)