In this poem the poetess describes features and qualities of her poem.
असावी तर अशी-कविता माझी कशी
देह नाचरा मोर
डोळे काळेभोर
कान कपाचा धरी-किणकिणणारी बशी
पुरणपोळीसम गोड
आंब्याची जणु फोड
भातावरती गरम-साजुक तूप जशी
अधरी पावा धरी
उडणारी ती परी
झोप सुखाची येण्या-मृदू पिसांची उशी