मंत्र हाच या सहस्त्रकाचा असी मसी अन कृषी
माणसातले देव शोधती मुनी आणखी ऋषी
शास्त्र लिहावे काव्य सुचावे जमीन कसावी अन रक्षावी
कन्या माता बहिणींसाठी घरकुल आणिक बाग असावी
पिता पुत्र अन बंधू सारे या भूमीचे पिऊन वारे
देशासाठी एक होऊया लोकशाहीला टिकवूया
मित्र मैत्रिणी करू एकजुट शुद्ध भावना मनात बळकट
स्वतंत्र भारत सुवर्ण भूमी तिच्याचसाठी लढतो आम्ही