सांजेला पिंपळी येताच थवे
आखाडी अवस पेटवी दिवे
पिंपळ पारावर मैफलीत
गप्पांच्या अड्ड्यात सुंदर खल
आषाढी धारांत गटारी न्हाती
खळखळ वेगे धावत जाती
खराटे घेऊन निघाल्या बाया
झाडून गटारी दिवे लावाया
गटार तीरी समयांची रांग
तुळशीच्या रानी डोलते भांग
सांजेला पिंपळी येताच थवे
आखाडी अवस पेटवी दिवे
पिंपळ पारावर मैफलीत
गप्पांच्या अड्ड्यात सुंदर खल
आषाढी धारांत गटारी न्हाती
खळखळ वेगे धावत जाती
खराटे घेऊन निघाल्या बाया
झाडून गटारी दिवे लावाया
गटार तीरी समयांची रांग
तुळशीच्या रानी डोलते भांग