मातीत मळून आलंय
आभाळ भरून आलंय
आभाळ ढगास ओढत
वीजेस धरून आलंय
वीजेस धुमार सौरभ
अर्पून सजून आलंय
रंगीत फुग्यास कोंडत
वायूस चिरून आलंय
पुत्रात चिराग दीपक
कन्येत लवून आलंय
हर्षात भ्रमात नाचत
वातात झुलून आलंय
चष्म्यास स्वतःच फोडत
इगोत जळून आलंय
पुष्पात सुगंध चंदन
रूपात खुलून आलंय
स्थापून जिनास शांतित
ब्रम्हास वरून आलंय
दारात विमान पुष्पक
धर्मात बसून आलंय
गोष्टीत सुवास पेरत
काव्यात तरून आलंय
आत्म्यास गुणास केवळ
आताच स्मरून आलंय
बुद्धीत प्रशांत सागर
ऋद्धीत बुडून आलंय
वेगात सुनेत्र वर्षत
भूमीत रुजून आलंय
अक्षर गण वृत्त – मात्रा १३
लगावली – गागाल लगाल गालल