एकदा मला एक जातीयवादी व्यक्ती भेटली.
तिने मला विचारले “तुझी जात कोणती”?
मी म्हणाले, “माझी जात बाईची”?
मग तिने मला विचारले, “तुझा धर्म कोणता”?
मी म्हणाले, “माझा धर्म आत्मधर्म”.
तिने विचारले, “या धर्माचे सार काय”?
मी म्हणाले, “या धर्मात आम्ही लोक, आत्म्यावर श्रद्धा ठेवतो
आणि मनगटाच्या बळावर विश्वास ठेवतो.
हातावरच्या रेषा आपल्याला हव्या तेवढ्याच
आणि अगदी हव्या तश्या सरळ
किंवा कधी कधी वळणदार ही काढतो.
त्यांना हवे तसे फाटेही फोडतो.
कधी मधी रेषांची नक्षीदार जाळीपण काढतो;
पण असे करताना आम्ही हातांना खूप खूप जपतो”…