In this poem the poetess describes the atmosphere in rainy season. In rainy season farmers are very happy. They do their work happily. They love animals in the farm like their kids.
आला पाऊस पाऊस
नको तू भांडूस भांडूस
बांधूया छप्पर गाईस
देऊया बाटूक पाड्यास
निवारा करूया बैलांस
मांडव घालूया वेलींस
पोती धुवूया ओढ्यात
वाळवू उन्हात रानात
इरली शिवूया झक्कास
घालून तयांना डोईस
वैरण कापूया तालात
कणसं भाजूया शेतात
आषाढ श्रावण झोकात
नाचतो माझिया गाण्यात
शिवार डोलेल वाऱ्यात