In this poem the poetess wants to become showery rain in the month of Shraavan(श्रावण).
कधी वाटे मजला व्हावे
रिमझिमती श्रावणधारा
लिपटून तनावर घ्यावा
मनी भरारणारा वारा
होऊन टपोरे थेंब
घुसळावे मातीत अंग
मातीत मिसळुनी जावे
हरवून स्वतःतच दंग
मग नकळत वरती यावे
अंकुर पोपटी व्हावे
हातांनी हिरव्या इवल्यारे
कवळून उन्हाला घ्यावे
मम देहास फुटावे पंख
पाचूसम हिरवे कंच
खुपसून ढगामधी चोच
गगनात उडावे उंच
घनतमास प्राशुन घ्यावे
तेजाळ बनुनिया वीज
मिटवून मना ऐकावी
तव नयनांमधली गाज