In this Ghazal(14 matras) there is a town of poems. In this town people speak in a language of poetry. They sing song of heart freely. Here we meet different animals and birds. In this town animals, birds, men and women have freedom of speech.
कवितेच्या गावा जावे
भरभरून द्यावे घ्यावे
ओठास लावुनी पावा
हृदयाचे गाणे गावे
कावळा शिकवितो गणिते
मैनेसह आले रावे
प्राशिती दूध बकरीचे
पाडसे आणखी छावे
ह्या कुणी अडविल्या वाटा
ना अजुनी मजला ठावे
भाबड्या सशाला आता
कळलेत कासवी कावे
बदनाम होउनी मीही
नावेवर लिहिली नावे
मोडून देवघर शिसवी
बनविले कैक मी पावे
वाटेवर सांज-धुळीच्या
सय बालपणीची भावे