उषःकाल…
अहा ! अहाहा ! अहा ! अहा !!
उषःकालचा रंग पहा !
ऊन सावली निळ्या नभी घन…
बागडते पानांवरती मन …
उषःकालच्या रम्य छटा या टिपून घेताना ,
मीच सावली ऊन जाहले स्वतःस टिपताना ….
काळ कर्दन…
मांजरांच्या मध्यरात्री लिहित आहे गोष्ट ही मम पोचलेली
माणसांतिल शूर मांजर उंदरांचा काळ कर्दन पोचलेली
लेखणीने पेलणारी धर्म अपुला मूढ नाही वीर आहे
मायभूच्या मृत्तिकेवर ठाकलेली शास्त्रधारक पोचलेली