माय मराठी प्राणाहुन प्रिय
मरगठ्ठे जन गर्जा जय जय
कुंडलिका अन नीरा पवना
मुळा मुठा वारणा कोयना
महाराष्ट्र मम सुजला सुफला
शिवबा शंभू जेथे लढला
कभिन्न कातळ फोडित पत्थर
स्वच्छ जले झुळझुळती निर्झर
ज्ञानदेव नामा तुकयाची
अभंग गाथा ओवी साची
पुणे मुंबई मावळ डगरी
खऱ्या शोभती उद्यम नगरी
वाऱ्या वाऱ्या घुमव बासरी
ओत काव्यजल भरुन घागरी