डबे जरी तव कैक नवे
इंजिन माझे ऐक नवे
अधर्म तू तर डोंबारी
करण्या संसारी वारी
फेकशील जर माळ्याला
चिटकुन बसशिल टाळ्याला
येतिल सैनिक जाळाया
जाळुन कचरा गाळाया
मूषक फाडे जाळ्यांना
निमित्त ठरण्या टाळ्यांना
किती किती तुज समजाऊ
तुझिया शब्दांना खाऊ
छक्के चौके फटकाऊ
नौकारांना मटकाऊ
मांजर माझी सुंदर रे
कर ले उसको अंदर रे
दुक्कल आली धावाया
डुक्कर गाडी ओढाया
काम करूया जोडीने
आत्मफळाच्या ओढीने
माय नेम यू टेल बरे
सिक्सर माझा झेल बरे
मस्त’सुनेत्रा’कुरूप तू
मी किल्ली अन कुलूप तू