कूप माझे विश्व अवघे
रूप मंडुक पिंड माझा
मी कुपातुन ब्रम्ह बघते
नीर प्राशुन तृप्त होते
चार ओळी मुक्त माझ्या
नाव त्याला काय देऊ
गा ल गा गा ना र ना ना
राधिकेला काय सांगू
कृष्णलीला रामलीला
कैक लिहिल्या कैक झाल्या
लपुन बसला मोक्ष कोठे
पाखराला ज्ञात नाही
पिंजऱ्याला फोड प्राण्या
पाखराला मुक्त करण्या