मुक्त जाहले जीव सर्व हे
आज सुखाचा दिवस खरा
सर्व जिवांचा धर्म अहिंसा
खरेपणा हा मंत्र बरा
जीवासाठी जीव जपूया
प्रेमासाठी प्रेम जपू
हृदयामधला ईश्वर दिसण्या
प्रत्येकातील मूल जपू
पूर्ण कराया तरुणांच्या अन
बालांच्याही इच्छांना
वृद्धत्वातील बाल्य जपूया
बाल्यामधल्या मोदांना
नको वाटते कर्मकांड तर
उखडुन टाका मनातुनी
दिसेल तुम्हा आत्म्यातिल इश
नित्य उमलत्या फुलातुनी
उडा बागडा आनंदाने
उडोत पक्षी प्राणीही
दिवस सुखाचे खरेच आले
चला गाऊया आपणही