जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू – JIN PRIY BRAMHAA EESH KHUDAA TOO


जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू
हृदयी अमुच्या रहा सदा तू…

नसे मागणे तुजला काही
कार्य करू सरसावून बाही
दिशा मोकळ्या आम्हा दाही
नीर तेज नभ पवन मृदा तू …

बदल घडावे घडण्यासाठी
चैतन्याला जपण्यासाठी
आनंदाने जगण्यासाठी
नाविन्याची सजग अदा तू…

दगडामधुनी खोदू लेणी
शुभ्र फुलांची गुंफू वेणी
पुरे जाहली देणीघेणी
लढण्यासाठी उचल गदा तू…
हृदयी अमुच्या रहा सदा तू

मात्रावृत्त(८+८=१६मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.