झुलते सुंदर वेल मांडव सोसे फुलभार
कुंपण ओले केतकी परसदार अन माड
परसदार अन माड नाहतो जलधारांनी
बहरुन गेले रान गातसे निर्झर गाणी
झरा वाहतो मुक्त मनाने पाणी उडते
चिंब भिजोनी एक सान तृणबाला झुलते
झुलते सुंदर वेल मांडव सोसे फुलभार
कुंपण ओले केतकी परसदार अन माड
परसदार अन माड नाहतो जलधारांनी
बहरुन गेले रान गातसे निर्झर गाणी
झरा वाहतो मुक्त मनाने पाणी उडते
चिंब भिजोनी एक सान तृणबाला झुलते