अधरांवरती असेल शिट्टी हातामध्ये घड्याळ झाडू
अचूक समयी भारतभूवर भ्रष्टाचारा उखडू जाळू
खांद्यावरती धनुष शिवाचे भात्यामध्ये बाण अक्षरी
हृदयमंदिरी सदा तिरंगा हीच असूदे सही स्वाक्षरी
तळ्यात कमळे बघत धावते इंजिन पाठी झुकझुक गाडी
दिडदा दिडदा गात फुलविते शेतमळे अन हिरवी झाडी
स्वार्थांधांना धूळ चारण्या मानव सारे एक होउया
जीव शृंखला टिकण्यासाठी आत्म्याचे संगीत ऐकुया
स्वभाव जपण्या स्वतः स्वतःचा नको दुजाला धरणे छळणे
सूर ताल अन लयीत तेंव्हा होइल अपुले मरणे जगणे