Indira sant wrote many poems related with love in nature, love in pure souls. Love is a soft and true relationship between human beings. As years passed its depth increases and hearts become pure. The inner beauty of love gives us joy.
This love gives charm to our whole personality. And at the end we realize that love is not found by searching for it. It lives in our own soul.
‘NAKO NAKO GA KAVITE’ is written on the original poem, ‘NAKO NAKO RE PAVASA’ written by the poetess Indira Sant
नको नको रे पावसा -कवयित्री इंदिरा संत
विडंबन कविता -नको नको ग कविते
नको नको ग कविते, नको अशी छळू मला;
पान पान वासरीचे, पुन्हा वाजे सळसळा!
तुझे शब्द शुभ्र गार, ओंजळीत झेलताना;
तळव्यांचे झाले डोळे, वाहणारे घळाघळा!
तुझ्या बोचणाऱ्या धारा, छप्पर न माझ्या घरा;
चिंब गारठले मन, कुठे घालू सुकायला?
खिडकीत चढवल्या, कुंडीतल्या जाई जुई;
न्हाऊ घाल फक्त त्यांना, नको उत्सव सोहळा!
नको नको म्हणताना, गाठतेस वेडयापरी;
कोण्या जन्मीचे सुगंधी, पुण्य येते मग फळा!
कोळशाने घासता मी, लख्ख रोज माझी पाटी;
उमटते तिच्यावर, खडीदार चंद्रकळा!