काव्यप्रकार -मंगळिका
नाकावरच्या रेषेवर लिहिलंय काय?
रुपसुंदर कन्येची ती कविता हाय.
कलेमध्ये खऱ्या प्रवीण मुलगी कोण?
वेदीवर जी ठेवतेय मूर्ती दोन.
मूर्तीमध्ये शोभतोय आत्मा छान।
कल्पनेने गाऊयात स्तुति गुणगान…
मात्रावृत्त – १४+७=२१
मंगळिका या काव्यप्रकारात ६ चरण असतात.
सहाही चरणात १४+७=२१ अश्या मात्रा असतात.
पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो.
दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे
पहिल्या व तिसऱ्या चरणात जो प्रश्न विचारलेला असतो
त्याचे उत्तर दिलेले असते.
शेवटचे दोन चरण मनुष्याच्या देहातील आत्म्यासंबंधी असतात.