ठिणगी पडण्या गार घासुया गारेवरती
निखार फुलण्या फुंकर घालू जाळावरती
वात टिकाया वात वळूया हातावरती
ज्योत तेवण्या ओंजळ धरुया समईवरती
फूल जपाया देह तोलुया काट्यावरती
प्रेम जिंकण्या शौच धरूया सत्यावरती
राध उजळण्या कषाय जाळू अग्नीवरती
मात्रावृत्त(८+८+८=२४ मात्रा)