गोड फळांचा रस मिळवाया हृदयामध्ये हवीच गोडी
आख्खा आंबा मिळूदे अथवा स्वच्छ बशीतून खाव्या फोडी
संत्री बोरे चिक्कू द्राक्षे केळी पेरू अननस नारळ
डाळींबाचा रस अमृतमय मधुमेहावर औषध जांभुळ
फळे मिळाया झाडे लावू निगराणीने तया वाढवू
निसर्ग जपण्या आणि फुलवण्या मनामनांतिल प्रेम जागवू