असेल कैसे शहर आंधळे
लोक आंधळे असतिल काही….
भ्रमर आंधळे नसतिल सारे
असतिल थोडे काही …
पाणवठ्यावर तुला जायचे
अजून तृष्णा असेल बाकी ….
दूर वाटतो पाणवठा जरी
पाणवठ्याचा रस्ता नाही ….
कवीस शोधे अजुनी राधा
गावामधल्या गल्ल्यांमधुनी …
कवीस याची खबरच नाही
पाणवठ्यावर कवी बसूनी…
माझ्या गोष्टी सुंदर सुंदर
ऐकायाला येच प्रियतमा…
माझी गाणी लहर सुगंधी
ना पाण्याची लाट प्रियतमा …
वसंत आला गा गा नाचा
प्रीत फुलांना उमलूद्या …
बेला उत्कट सांजेची ही
आतम रंगी रंगूद्या …
नाव सुनेत्रा सुंदर माझे
मी तर माझ्यावरती मरे
कवी अन शायर मरती स्वतःवर
हे अंधांचे नगर नसे …